आईपीएल सामने म्हटलं कि डोळ्यासमोर येतं ते म्हणजे, चौकार, षटकार आणि उत्कृष्ट शेत्ररक्षणाचे नमुने. आईपीएलमध्ये भारतीय खेळाडू आणि विदेशी खेळाडू एकत्र खेळतात. त्यामुळे भारतीय खेळाडूंची आणि विदेशी खेळाडूंची चांगली मैत्री जमते. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे आणि इतर संघांचे सबंध चांगले होत आहेत. आईपीएलमध्ये जेवढे क्रिकेट आहे तेवढीच मज्जा मस्तीसुद्धा आहे.
आयपीएलदरम्यान प्रत्येक संघाची फ्रेंचाइजी आपल्या खेळाडूंसाठी काहीना काही आयोजन करत असते. मग त्यात विविध प्रकारचे खेळ, गप्पा गोष्टी, नाच- गाणे हे सगळं चालू असते. अशातच आता एक व्हिडीओ सनरायजर्स हैदराबाद संघाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरने सोशल मिडियावर शेअर केला आहे. पाहूया कशाबद्दल आहे ते व्हिडीओ…
डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे आणि राशिद खान हे सनरायझर्स हैद्राबाद संघाचे तीन मुख्य खेळाडू. हे तिन्ही खेळाडू आपल्या संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. हे तिन्ही खेळाडू वेग वेगळ्या देशाचे आहेत. परंतु, आईपीएलमुळे त्यांना एकत्र येण्याची संधी मिळाली. ते क्रिकेट व्यतिरीक्तही अनेक गोष्टी आयपीएल दरम्यान करतात. आता त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात ते मजेशीर नाचताना दिसत आहेत.
वॉर्नरनने हा व्हिडीओ शेअर केला आहे तो एका जाहिरातीच्या वेळेस केलेलं चित्रीत केलेला आहे. त्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे कि, हे तीघेही चटईवर बसलेले आहेत आणि त्यांनी नाचायला सुरुवात केली. त्यांचा नाच इतका मजेशीर होता कि, ते स्वत:ला सुद्धा हसण्यापासून रोखू शकले नाहीत. वॉर्नरनने या छायाचित्रणाला असे कॅप्शन दिले आहे की “जाहिरात शुट करण्याचा आमचा प्रयत्न” ( our attempt of a commercial). वॉर्नर नेहमीच असे मजेशीर किस्से सोशल मिडियावार शेअर करत असतो. हा व्हिडीओ चाहत्यांना आवडला असून त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
https://www.instagram.com/p/CP2Ti7GlB3C/
वॉर्नरला सोशल मिडियावर व्हिडीओ शुट करुन पोस्ट करण्याची खूपच हौस आहे. तो नेहमी आपल्या फावल्या वेळेत आपल्या पत्नीसोबत आणि मुलींसोबत वेगवेगळे व्हिडीओ शुट करत असतो. त्याला खास करून भारतीय आणि साउथ इंडिअन चित्रपटांवर व्हिडीओ बनवायला आवडतात.
वॉर्नरचा एक व्हिडीओ सध्या खूप गाजला होता तो म्हणजे त्याने ‘बुटाबोमा’ गाण्यावर केलेला नाच. या व्हिडीओला भारतीय प्रेक्षकांनी खूपच प्रतिसाद दिला होता आणि एकदा चालू सामन्यात वॉर्नरने या गाण्याच्या काही स्टेप मैदानात करुन दाखविल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये न्यूझीलंडला चारीमुंड्या चित करत भारतीय संघ घेणार १८ वर्षांचा सूड!
पहिल्या कसोटी चॅम्पियनशीप विजयासाठी कर्णधार विराटला कट्टर विरोधी संघातून ‘हा’ महत्त्वाचा सल्ला
स्मिथ-मॅक्सवेलसह दिग्गज खेळाडू घेऊ शकतात ‘या’ महत्त्वाच्या दौऱ्यातून माघार