बुधवारी (२१ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीगमध्ये चौदावा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स असा खेळला गेला. हैदराबादने या सामन्यात ९ गड्यांनी मोठा विजय मिळवत गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली. गोलंदाजांच्या एकत्रित दमदार कामगिरीमुळे व जॉनी बेअरस्टोच्या नाबाद अर्धशतकामुळे हैदराबादने हंगामातील पहिला विजय साकारला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने एक अफलातून झेल देत सर्वांची मने जिंकली.
वॉर्नरचा नेत्रदीपक झेल
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आपले नेतृत्व व फलंदाजीने संघासाठी नेहमी योगदान देत असतो. तसेच, वॉर्नरला एक सुरक्षित क्षेत्ररक्षकदेखील मानले जाते. वॉर्नरने या सामन्यात आपल्या दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा अप्रतिम नमुना सादर केला. पंजाबचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरन याला थेट फेककरून वॉर्नरने तंबूत धाडले. त्यानंतर देखील वॉर्नरने पुन्हा आपल्या क्षेत्ररक्षणाचा करिष्मा दाखवला.
आयपीएलमध्ये प्रथमच खेळणारा वेस्ट इंडीजचा अष्टपैलू फॅबियन ऍलनने हैदराबादचा वेगवान गोलंदाज खलिल अहमदच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, कव्हर्समध्ये उभ्या असलेल्या डेव्हिड वॉर्नरने चित्त्याच्या चपळाईने हवेमध्ये झेप मारून एक अप्रतिम झेल पकडला.
David Warner Catch 🔥@SunRisers – #SRH pic.twitter.com/WKt85WmOSF
— Orange Army SRH (@orangearmysrh) April 21, 2021
हैदराबादचा पहिला विजय
सलग तीन पराभवानंतर सनरायझर्स हैदराबाद या सामन्यात उतरला. नाणेफेक गमावल्यानंतर गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत पंजाबच्या फलंदाजांना मोकळीक दिली नाही. पंजाबचा डाव केवळ १२० धावांमध्ये आटोपला. खलिल अहमदने तीन तर, अभिषेक शर्माने २ बळी आपल्या नावे केले.
प्रत्युत्तरात, डेव्हिड वॉर्नर व जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी केली. केन विलियम्सन व बेअरस्टो यांनी अखेरपर्यंत नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. नाबाद अर्धशतक ठोकणारा बेअरस्टो सामनावीर ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
एमएस धोनी, रोहित शर्माच्या पंक्तीत आता दिनेश कार्तिकनेही मिळवले स्थान; केला ‘हा’ कारनामा
एकाच मोसमात तिन प्रकारे शुन्यावर बाद होणारा दुसरा फलंदाज बनला पूरन, ‘हा’ दिग्गज ठरलेला पहिला मानकरी
फिंचला हटवून हा खेळाडू टी२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानी, तर विराट ‘या’ क्रमांकावर