ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघातील टी-20 मालिका बुधवारी (21 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. पण तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याची मोठी प्रतिक्रिया समोर येत आहे. वॉर्नरने खेळण्यासाठी मैदानात उतरण्याआधीच न्यूझीलंडमधील प्रेक्षकांवर निशाणा साधला आहे.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया ही क्रिकेट जगतात नेहमी चर्चेत राहिलेली रायवलरी आहे. डेव्हिड वॉर्नर (David Warner) याच्या मते न्यूझीलंड संघाचे चाहते मैदाना ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत व्यवस्थित वागण्याची जराही अपेक्षा नाहीये. वॉर्नरला वाटते की, न्यूझीलंडमध्ये खेळताना स्टेडियमधील चाहत्यांकडून ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ट्रोल केले जाईल. पण ऑस्ट्रेलियन खेळाडू मात्र आपल्या खेळावर लक्ष देतील.
यावेळीही न्यूझीलंडमध्ये खेळताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंना प्रचंड त्रास होण्याची शक्यता वॉर्नरने व्यक्त केली. टी-20 मालिका सुरू होण्याआधी वॉर्नर माध्यमांसमोर म्हणाला, “कटू सत्य हे आहे की, आम्ही दोन्ही देश शेजारी आहोत. खेळात नेहमी एकमेकांना हरवण्याचा प्रयत्न आमचा आसतो. त्यामुळे मैदानातील प्रेक्षक यावेळीही आम्हाला निशाणा बनवतील, असे वाटत आहे. आम्ही नेहमी म्हणतो की, एका काणाने ऐका आणि दुसऱ्या काणाने सोडून द्या. जर मला काही काही बोलले गेले, तर मी जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करेल.”
“येथील प्रेक्षक वैयक्तिक गोष्टींवर बोलतात. पण जर ते तस करत असतील, तर ते त्यांचे व्यक्तिमत्व आहे. हे लोकांचे आपले स्वतःचे विचार आहेत. जर त्यांनी हेच करण्यासाठी पैसे खर्च केले असतात. पण माझ्या मते तुम्हाला शिविगाळ करायचीच आहे, तर तर घरी जाऊन झोपा,” असेही वॉर्नर पुढे म्हणाला.
त्याचे कारण असे की, न्यूझीलंडमध्ये खेळताना डेव्हिड वॉर्नरचा अनुभव चांगला नाहीये. 2016 मध्ये वॉर्नर कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये गेला होता, तेव्हा स्टॅन्डमधील चाहत्यांकडून त्यांना प्रचंड त्रास दिला गेला होता. ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत शिवीगाळ झाल्याचे समोर आले होते. वॉर्नरच्या मते न्यूझीलंडमधील क्राउड खेळाडूंवर अपमानास्पद वर्तन करतो. (David Warner upset ahead of T20 series against New Zealand)
महत्वाच्या बातम्या –
T20 World Cup । हार्दिक पंड्या की रोहित शर्मा? दादांनी सांगितले सर्वोत्तम कर्णधाराचे नाव
लोकसभा निवडणुकीसाठी शुबमन गिलवर मोठी जबाबदारी, नव्या भूमिकेत दिसणार युवा फलंदाज