भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे मालिका ४-१ असा जिंकला. पहिल्या तिन्ही वनडे सामन्यात हार पत्करल्यानंतर बंगलोरमधील वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करत सामना जिंकला. या विजयात सलामीवीर डेविड वॉर्नरचा सिहांचा वाटा होता.
ऑस्ट्रेलियाचा संघ हा नेहमी त्याच्या कधीही हार न मानण्याच्या प्रवृत्तीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा संघ सामना जिंकण्यासाठी कुठल्याही स्थराला जाऊ शकतो हे ही आपण या आधी पहिले आहे. २००८ मध्ये जेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता तेव्हा हे सर्व भारतीयांनी पहिले आहे. पण त्या ऑस्ट्रेलियाच्या संघातही एक प्रामाणिक खेळाडू होता ज्याच्याकडे खिलाडूवृत्ती होती, तो म्हणजे अॅडम गिलख्रिस्ट.
सध्या भारतात खेळत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघातही एक असा खेळाडू आहे, तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर. चौथ्या सामन्यात वॉर्नरने शतक केले पण त्याच बरोबर तो फलंदाजीला असताना एक असा किस्सा घडला ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघातही खिलाडूवृत्ती आहे याचे दर्शन झाले.
नक्की घडले काय.
कालच्या सामन्यात २८व्या षटकाट चौथा चेंडू टाकण्यासाठी भारताचा हार्दिक पंड्या जेव्हा धावत येत होता तेव्हा त्याच्या हातातून चेंडू सटकला आणि घरंगळत चेंडू खेळपट्टीवर पुढे निघून गेला. तेव्हा नॉन स्ट्रायकरवर असलेल्या डेविड वॉर्नरने लगेचच पळत जाऊन तो चेंडू पांड्याला उचलून दिला. हे पाहिल्यानंतर दर्शकांनी त्याचे कौतुक केले.
http://www.bcci.tv/videos/id/4989/sportsmans-spirit-on-display-from-david-warner
वॉर्नरने असे करण्याची हि पहिली वेळ नाही.
Fantastic shoemanship from David Warner in the #IPL overnight… pic.twitter.com/nIiwAoG0Rg
— TAB (@tabcomau) April 10, 2017