गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज आणि कसोटी संघाचा माजी कर्णधार टीम पेन चर्चेत आहे. एका महिलेसोबत अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याबद्दल त्याला केवळ माफी मागावी लागली नाही तर कर्णधारपदही सोडावे लागले. या संपूर्ण घटनेनंतर पेनवर सर्वत्र टीका होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडिस वॉर्नरनेही प्रतिक्रिया दिली आहे.
ती म्हणाली की, क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) या संपूर्ण प्रकरणामध्ये दुटप्पी धोरण अवलंबत आहे. कारण एकीकडे ते संदेश देत आहेत की, ऑस्ट्रेलियन कर्णधाराने हे करणे चुकीचे आहे. परंतु ऑस्ट्रेलियन खेळाडूने असे करणे ठीक आहे.
कॅंडिस वॉर्नरने ‘2GB रेडिओ’शी बोलताना सांगितले की, “क्रिकेट ऑस्ट्रेलिया म्हणत आहेत की ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधाराने असे करणे योग्य नाही, परंतु ऑस्ट्रेलियन खेळाडूसाठी हे ठीक आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी म्हणून हे थोडे चिंताजनक आहे. आणि मला काळजी वाटते आहे.”
या प्रकरणी पेनची पत्नी बॉनी पेन हिनेही प्रतिक्रिया दिली होती. याबाबत बोलताना बॉनी पेन म्हणाली होती की, “मला टिमबद्दल थोडी सहानुभूती आहे. खरं तर खूप जास्त. आम्ही दोघांनी २०१८ मध्ये या गोष्टींचा वैयक्तिकरित्या सामना केला आहे.”
तसेच बॉनी पेनने पुढे म्हटले होते की, “कुणीही परिपूर्ण नसतं. तुम्हाला समोरच्या व्यक्तीला दुसरी संधी द्यावीच लागते. मी आधी म्हटल्याप्रमाणे, टिमने स्वतः येऊन मला सर्वकाही सांगितलं होत. त्याला तसं करण्याची गरज नव्हती. त्याने खरे सांगितले याबद्दल मला त्याचा खूप अभिमान आहे. प्रेमाचा प्रश्न कधीच नव्हता; आम्ही नेहमीच एकमेकांवर प्रेम केले आहे.”
काय आहे नेमकं प्रकरण?
साल २०१७ मध्ये टास्मानिया क्रिकेटमधील एका महिला कर्मचारीला अश्लील फोटो आणि मॅसेज केल्याचा आरोप टिम पेनवर झाला आहे. आता त्याने त्या प्रकरणाबाबत सर्वांची माफी मागत कसोटीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २०१८ मध्ये झालेल्या या प्रकरणी टास्मानिया क्रिकेट आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टिम पेनला क्लीन चिट दिली होती. तपासानुसार, ही टीम पेनची वैयक्तिक बाब होती आणि त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आचारसंहितेचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन झालेले नव्हते. परंतु आता ते प्रकरण जास्तच चिघळल्याने टिम पेनची कारकिर्द धोक्यात आल्याचे दिसते आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेत राहुल चाहरला चाखायला मिळाला कडक चहाचा स्वाद, रिऍक्शन पाहून चाहते लोटपोट
नंबर वन महिला टेनिसपटू एश्ले बार्टी झाली ‘एंगेज’; इंस्टाग्रामवर शेअर केला खास फोटो
‘थांबायची हीच योग्य वेळ!’ म्हणत बांगलादेश टी२० संघाचा कर्णधार महमदुल्लाचा कसोटी क्रिकेटला अलविदा