ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर (David Warner) यंदा इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) खेळू शकणार नाही. मेगा लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि ‘सनरायझर्स हैदराबाद’साठी (Sunrisers Hyderabad) भरपूर धावा करणारा हा खेळाडू मेगा लिलावात न विकला गेला. गेल्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. आयपीएलमध्ये खरेदीदार न मिळाल्याने तो पाकिस्तानकडे वळला आहे. वॉर्नर आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) खेळताना दिसणार आहे.
डेव्हिड वॉर्नर (David Warner) पाकिस्तान सुपर लीग हंगाम 10च्या ड्राफ्टसाठी नोंदणी करणारा नवीन मार्की खेळाडू बनला आहे. त्याच्या अधिकृत एक्स खात्यावर बातमी जाहीर करताना, पाकिस्तान सुपर लीगने (PSL) सांगितले की, “2024चा शेवट मोठ्या प्रमाणावर झाला. ऑस्ट्रेलियन पॉवरहाऊस डेव्हिड वॉर्नरने पीएसएल ड्राफ्टसाठी नोंदणी केली आहे. आगामी पीएसएल हंगाम 10चा ड्राफ्ट 11 जानेवारी रोजी होणार आहे.
पाकिस्तान सुपर लीग (PSL) (8 एप्रिल ते 19 मे) यादरम्यान होणार आहे. ती आयपीएलशी स्पर्धा करेल, पण भारताच्या स्पर्धेसमोर त्याची चमक फिकी पडली आहे. मात्र, वॉर्नरच्या समावेशामुळे या लीगची चर्चा पूर्वीपेक्षा थोडी अधिकच रंगणार आहे. त्यामध्ये वॉर्नर आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी (Tim Southee) सारख्या स्टार्सचा समावेश असेल. वॉर्नरचा पीएसएल ड्राफ्टमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय त्याच्या कारकिर्दीत अनपेक्षित वळणानंतर आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025च्या मेगा लिलावात सहभागी झालेल्या या अनुभवी सलामीवीराला कोणीही विकत घेऊ शकले नाही.
ENDING 2024 ON A HIGH 🕺🏻🕺🏻
The Aussie🇦🇺 powerhouse 🐂 David Warner has registered for the #HBLPSLDraft! pic.twitter.com/yyrVcS71Uk
— PakistanSuperLeague (@thePSLt20) December 31, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; फाॅर्ममध्ये नसलेल्या खेळाडूंवर संतापले भारतीय प्रशिक्षक, म्हणाले…
BGT 2024-25: निवडकर्त्यांनी गौतम गंभीरचे ऐकले नाही, हेड कोचला चेतेश्वर पुजाराला संघात आणायचे होते
IND vs AUS: “आता खूप झाले….”, गौतम गंभीर टीम इंडियाच्या खेळाडूंवर नाराज