---Advertisement---

बापाची वेडी माया! सीएसकेविरुद्धच्या सामन्यात लेकींच्या प्रेमापोटी केलं असं काही, पाहून कराल ‘सलाम’

On: बुधवार, एप्रिल 28, 2021 9:51 PM
---Advertisement---

बुधवार रोजी (२८ एप्रिल) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघ आमने सामने होते. हा सामना जिंकत प्रतिस्पर्धी चेन्नईची विजयी लय रोखण्यासाठी आणि आपली डगमगती गाडी रुळावर आणण्यासाठी हैदराबादचा संघ मैदानावर झगडताना दिसला. दरम्यान हैदराबादचा संघनायक डेविड वॉर्नर याने ‘कॅप्टन्सी इंनिंग’ खेळत चेन्नईपुढे १७२ धावांचे तगडे आव्हान उभारले. दरम्यान वॉर्नरचे वडीलप्रेम पाहायला मिळाले.

हा ३४ वर्षीय ऑस्ट्रेलियन फलंदाज तीन मुलींचा बाप असल्याचे आपल्या सर्वांना माहिती आहे. २०१५ साली कँडिस वॉर्नरसोबत लग्नगाठ बांधलेल्या वॉर्नरच्या मुलींची नावे, आयवी मे वॉर्नर, इंडी रे वॉर्नर आणि इस्ला रोज वॉर्नर आहेत. इस्ला (Isla Rose Warner) ही त्याची सर्वात लहान लेक आहे. तर आयवी (Ivy Mae Warner) ही थोरली आणि इंडी (Indi Rae Warner) ही मधली लेक आहे.

आपल्या कुटुंबीयांना सोडून आयपीएल २०२१ साठी भारतात आलेल्या वॉर्नरने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात अतिशय कौतुकास्पद कृती केली. त्याने फलंदाजीसाठी मैदानावर उतरल्यावर आपल्या मुलींची नावे असलेले शूज घातले होते. त्याच्या पांढऱ्या रंगांच्या शूजवर मागील बाजूला आयवी, इंडी आणि इस्ला असे लिहिलेले होते. एवढेच नव्हे तर, त्याच्या शूजवरील एका बाजूला पत्नी कँडिसचेही नाव लिहिलेले होते

फलंदाजी करत असताना वॉर्नरने आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर कॅमेरामनने त्याच्या शूजवर कॅमेरा फोकस केला आणि सामना दर्शकांचे त्याकडे लक्ष वेधले गेले. यानंतर सोशल मीडियावर त्याच्या या कृतीची भन्नाट चर्चा रंगली आहे. अनेकांनी त्याला आदर्श वडील म्हणत त्याचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

https://twitter.com/ryandesa_07/status/1387427597215158272?s=20

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या हैदराबादकडून वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो सलामीला फलंदाजीसाठी आले होते. चौथ्या षटकातच अवघ्या ७ धावा करत बेयरस्टो पव्हेलियनला परतला. परंतु वॉर्नरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मनिष पांडेसोबत मिळून शतकी भागिदारी केली. ५५ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने त्याने ५७ धावा चोपल्या होत्या. यासह त्याने ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमधील १०००० धावांचा पल्ला पूर्ण केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

CSK vs SRH Live: डेव्हिड वॉर्नर, मनिष पांडेच्या अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादचे चेन्नईला १७२ धावांचे आव्हान

विराट आणि एबी स्वतःचं एक प्रशिक्षक आहेत; जाणून घ्या का असे म्हणाले आरसीबीचे कोच

‘क्रिकेटरला संघातून दूर नेऊ शकता, पण त्याच्यातील चाहत्याला नाही’, अवेश खानच्या ‘त्या’ कृतीवर बेंगलोरची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---