---Advertisement---

कारकिर्दीतील शेवटच्या कसोटीआधी वॉर्नर टेंशनमध्ये! मौल्यवान बॅगी ग्रीन कॅपची चोरी

On: मंगळवार, जानेवारी 2, 2024 11:42 AM
David Warner with Baggy green Cap
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सिनडी कसोटीनंतर निवृत्त होत आहे. वॉर्नरसाठी हा कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना नक्कीच महत्वाचा आहे. पण या सामन्याआधी एक मोठी बातमी समोर येत आहे. मेलबर्नवरून सिडनीला जाताना विमानप्रवासादरम्यान वॉर्नरची सामनातून एक बॅगपॅग चोरील्या गेल्याचे समजते. यातमध्ये त्याची बॅगी ग्रीन कॅप देखील होती.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. उभय संगांतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर आयोजित केला गेला आहे. 3 जानेवारी रोजी हा सामना सुरू होईल. ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यात विजय मिळवून डेव्हिड वॉर्नर () याला निरोप देण्याच्या प्रयत्नात असेल. तसेच वॉर्नर देखील या कसोटी सामन्यात जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करेल. वॉर्नर आपल्या होम ग्राउंडवर कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार असल्यामुळे हा सामना अजूनच खास होईल. सलामीवीर फलंदाज आपल्या शेवटच्या सामन्यात आपल्या पहिल्या सामन्यात मिळालेली बॅगी ग्रीन कॅप घालून खेळताना दिसू शकत होता. पण त्याआधीच ही कॅप चोरीला गेली.

बरीच वाट पाहिल्यानंतर वॉर्नरने अखेर आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही कॅप परत करण्यासाठी विनंती केली आहे. वॉर्नरने पोस्ट केलेल्या व्हिडिओत तो म्हणत आहे की, “कोणीतरी माझ्या सामनातून माझे बॅगपॅक उचलले आहे. यामध्ये माझी बॅगी ग्रीन कॅप आणि माझ्या मुलीसाठी भेटवस्तू होत्या. त्यामुळे माझ्या भावना याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. हे सामना मला परत मिळावे, असी माझी इच्छा आहे. जर तुम्ही हे बॅगपॅक परत केले, तर तुमच्यावर कोणतीच कारवाई केली जाणार नाही. तसेच त्यानंतर ही बॅग देखील तुम्हाला देईल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31) 

दरम्यान, वॉर्नरला आपल्या शेवटच्या कसोटी सामन्याआधी ही बॅगी ग्रीन कॅप पुन्हा मिळणार की नाही, हे लवकरच समजेल. पण त्याचे या सामन्यातील प्रदर्शन सर्वांसाठी महत्वाचे असेल. मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानला पराभूत केले आहे. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने विजय मिळवला, तर पाकिस्तानला व्हाईट वॉश देता येऊ शकतो. (David Warner’s baggy green cap has been stolen)

महत्वाच्या बातम्या – 
Happy New Year 2024 । सर्वांना शुभेच्छा देताना जाफरकडून ‘या’ खेळाडूचा उल्लेख, टीम इंडियाला काढला चिमटा
निवृत्तीनंतर स्टुअर्ट ब्रॉडला पश्चाताप? म्हणाला, ‘मी अजून काही वर्ष खेळलो असतो…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---