टॉप बातम्या

कारकिर्दीतील 100व्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वॉर्नरनेची तोडफोट फलंदाजी, टेलर-विराटच्या यादीत मिळवलं स्थान

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने शुक्रवारी (9 फेब्रुवारी) आपला 100वा टी-20 सामना खेळला. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातील हा सामना होबार्टमध्ये खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 7 विकेट्सच्या नुकसानावर 213 धावा कुटल्या. डेव्हिड वॉर्नर याने कसोटी आणि वनडे फॉरमॅटमधील आपल्या 100व्या सामन्याप्रमाणे हाही सामना आठवणी राहण्यासारखा खेळून काढला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये 100+ सामने खेळणारे याआधी फक्त दोन खेळाडू होते. विराट कोहली आणि रॉस टेलर यांच्यानंतर आता डेव्हिड वॉर्नर (David Warner) शुक्रवारी या यादीत जोडला गेला. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 मालिकेचा हा पहिला सामना होता. वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियासाठी डेव्हिड वॉर्नर याने अवघ्या 24 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. सलामीला आलेला वॉर्नर शतक करेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण त्याने 13व्या षटकात यष्टीरक्षक निकोलस पूरन याच्या हातात विकेट गमावली. त्यावेळी अर्झारी जोसेफ गोलंदाजी करत होता.

कसोटी, वनडे आणि आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 सामन्यांटा टप्पा पार करणारा वॉर्नर पहिलाच ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. त्याने कसोटी क्रिकेटमधील आपल्या 100व्या सामन्यात 255 चेंडूत 200 धावांची खेळी केली होती. वनडे फॉरमॅटमधील आपल्या 100व्या सामन्यात त्याने 119 चेंडूत 124 धावांची खेली साकारली होती. वॉर्नरने शुक्रवारी अवघ्या 36 चेंडूत 70 धावांची खेळी केली आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमधील आपला 100वा सामना आठवणीत राहण्यासारखा बनवला. (David Warner’s innings for Australia against West Indies on Friday was special)

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन – 
वेस्ट इंडिज – ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शाई होप, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ.

ऑस्ट्रेलिया – डेव्हिड वॉर्नर, जोश इंग्लिस, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शॉन ॲबॉट, ॲडम झाम्पा, जेसन बेहरनडॉर्फ, जोश हेझलवूड.

महत्वाच्या बातम्या – 
जडेजाच्या वडिलांनी तोडले मुलाशी सर्व संबंध, घरातील वाद चव्हाट्यावर; पत्नी रिवाबा ठरली कारण
IND vs ENG : बुमराह आणि अँडरसन यांच्यातील क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज कोण? जाणून व्हाल थक्क…

Related Articles