इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत, बायोबबल भेदून कोरोनाने शिरकाव केल्याचे पाहायला मिळाले होते. काही संघांच्या खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागल्याने आयपीएल स्पर्धा २९ सामन्यांनंतर स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे सर्व खेळाडू आपल्या घरी परतले आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघाचा माजी कर्णधार डेविड वॉर्नर देखील सोमवारी आपल्या घरी पोहोचला आहे. अशातच त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२१ स्पर्धेत डेविड वॉर्नरने निराशाजनक कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याला सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधार पदावरून देखील काढून टाकण्यात आले होते आणि विलियम्सनला कर्णधार करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर, वॉर्नरला या हंगामात हैदराबादने खेळलेल्या ७ व्या सामन्यातील अंतिम ११ जणांच्या संघातून देखील वगळण्यात आले होते. त्यावेळी त्या सामन्यादरम्यानचा त्याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो भावूक झाल्याचे दिसून आले होते.
आता स्वत: वॉर्नरनेच याच सामन्यातील सीमारेषेजवळ बसलेला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोवर त्याने ” कॅप्शन सुचवा ” असे लिहिले आहे.
https://www.instagram.com/p/CPngYyHrKXQ/?utm_medium=copy_link
अनेक क्रिकेट चाहते या फोटोवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने या पोस्टवर प्रतिक्रीया देत लिहिले की, “तुम्ही विचार करत आहात की संघात पुनरागमन केव्हा होणार.” या पोस्टला ५ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाने या हंगामात निराशाजनक कामगिरी केली होती. त्यांनी हा हंगाम स्थगित होण्यापूर्वी एकूण ७ सामने खेळले. यामध्ये त्यांना अवघ्या १ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. आता स्थगित झालेला हा हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पुन्हा सुरु होणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यात हैदराबादला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
स्वारी इंग्लंडची! भारतीय खेळाडू कुटुंबाला घेऊन इंग्लंडला रवाना; विरुष्कासह मुलगी वामिका फोटोत कैद
किवी कर्णधार विलियम्सन इंग्लंडविरुद्ध पहिल्याच डावात फ्लॉप; अँडरसनने केले सुरेखरित्या क्लीनबोल्ड