David Warner Baggy Green: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला त्याची ‘बॅगी ग्रीन कॅप’ परत मिळाली आहे. मेलबर्नहून सिडनीला येत असताना, वॉर्नरची बॅकपॅक चोरीला गेली, त्यात त्याची बॅगी ग्रीनही होती. यानंतर डेव्हिड वॉर्नरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून परत देण्याचे विनंती केली होती. आता त्याला त्याची कॅप परत मिळाली आहे. ती त्याच्या हॉटेलच्या खोलीत सापडली. मात्र, त्याची चोरीला गेलेली कॅप हॉटेलपर्यंत कशी पोहोचला, हे अद्याप समजू शकलेले नाही.
डेव्हिड वॉर्नर (David Warner) सिडनीमध्ये पाकिस्तानविरुद्ध कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळत आहे. मात्र, हा सामना सुरू होण्यापूर्वी सिडनीला येत असताना डेव्हिड वॉर्नरची बॅग चोरीला गेली, ज्यामध्ये त्याची टेस्ट कॅपही ठेवण्यात आली होती. डेव्हिड वॉर्नरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून ही बॅग परत करण्याची विनंती केली होती. जो कोणी ही बॅग परत करेल, त्याला त्याची क्रिकेट ऑस्ट्रेलिया बॅग भेट देईल, असे तो म्हणाला होता. डेव्हिड वॉर्नरला त्याच्या कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात आपली कॅप कोणत्याही किंमतीत मिळवायची होती आणि म्हणूनच त्याने सोशल मीडियावर ही भावनिक पोस्ट केली होती. (david warners missing baggy green has been found)
View this post on Instagram
डेव्हिड वॉर्नरने आता त्याची हरवलेली बॅगी ग्रीन सापडली असल्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून आनंद व्यक्त केला आहे. वॉर्नर म्हणाला, “मला सर्वांना सांगताना खूप आनंद होत आहे की, मला माझी बॅगी ग्रीन मिळाली आहे आणि ही खूप चांगली बातमी आहे. ज्याने मला ते शोधण्यात मदत केली त्यांचा मी आभारी आहे. मी क्वांटास, कार्गो कंपनी, हॉटेल आणि संघ व्यवस्थापन यांचे आभार मानू इच्छितो. या कॅपची किंमत काय आहे हे जो क्रिकेटपटू आहे त्यालाच कळू शकते.” (AUS vs PAK Good news for David Warner, ‘Baggy Green’ lost in farewell Test match is back)
हेही वाचा
Ranji Trophy: काय सांगता! बिहारने मुंबई विरुद्धच्या रणजी सामन्यासाठी चक्क दोन संघ केले जाहीर, वाचा नक्की काय आहे प्रकरण
IND vs SA: मास्टर ब्लास्टरही झाला बुमराहाच्या गोलंदाजीवर खूश, म्हणाला, ‘त्याने दाखवले की…’