इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी मालिकेला बुधवारी (२ जून) सुरुवात झाली आहे. लॉर्ड्समध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेले काही महिने, जगभरात कोरोनाचे सावट असल्यामुळे प्रेक्षकांना मैदानात येऊन सामने पाहण्याची संधी दिली गेली नव्हती. या सामन्यात त्यांचेही आगमन झाले. तसेच ऑस्ट्रेलियन संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरने देखील आपल्या घरून या सामन्याचा आनंद घेतला. अशातच त्याने एक ट्विट केले आहे. जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
यावर्षाच्या अखेरीस इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा ॲशेसला प्रारंभ होणार आहे. यापूर्वी झालेल्या शेवटच्या ॲशेस मालिकेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने डेविड वॉर्नरला अडचणीत टाकले होते. २०१९साली झालेल्या या मालिकेत वॉर्नर सर्वाधिकवेळा ब्रॉडच्याच गोलंदाजीवर बाद झाला होता. डेविड वॉर्नरने याच गोष्टीची आठवण ठेवत आपल्या ट्विटर अकाऊंटवर बुधवारी स्टुअर्ट ब्रॉडचा न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील फोटो शेअर करत लिहिले की, “मी ऑस्ट्रेलियामध्ये झोपण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु हा खेळाडू माझ्या टिव्ही स्क्रिनवर दिसला. ॲशेसपूर्वी झोपण्याचे अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत.”
Trying to get some sleep here in Aus but this bloke pops up on my tv screen!! Few months to get some sleep before the Ashes down under 😂😂 #ashes #cricket pic.twitter.com/hEOTCzbiD4
— David Warner (@davidwarner31) June 2, 2021
ॲशेस २०१९ मालिकेत डेविड वॉर्नरची निराशाजनक कामगिरी
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात २०१९ मध्ये झालेली ॲशेस मालिका इंग्लंडमध्ये खेळली गेली होती. या मालिकेत डेविड वॉर्नरला, स्टुअर्ट ब्रॉडने खेळपट्टीवर उभे राहणे ही कठीण करून ठेवले होते. वॉर्नरने १० डावात अवघ्या ९५ धावा केल्या होत्या. तर मुख्य बाब म्हणजे या १० डावात त्याला ७ वेळेस स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले होते. २०१९ मध्ये झालेली ॲशेस मालिका २-२ ने बरोबरीत सुटली होती. परंतु, ॲशेस ट्रॉफी आपल्याकडे राखण्यात ऑस्ट्रेलिया यशस्वी ठरले होते.
ॲशेस मालिकेतील डेविड वॉर्नरची कामगिरी
ऑस्ट्रेलियन संघाच्या या धडाकेबाज फलंदाज वॉर्नरने ॲशेस मालिकेत आतापर्यंत एकूण २३ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ३९.३९ च्या सरासरीने १६१५ धावा करण्यात यश आले आहे. यात त्याला ३ शतकं आणि १२ अर्धशतकं झळकावण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: गल्ली क्रिकेटर ते सुलतान ऑफ स्विंग कसा झाला अक्रम?
जेव्हा तब्बल ४२ चौकारांसह विवियन रिचर्ड्स यांनी ठोकले होते तुफनी त्रिशतक, वाचा त्या खास खेळीबद्दल
नवखा कॉनवे नडला इंग्लंडला, लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावे