१५ ऑगस्ट २०२२ रोजी संपूर्ण भारतदेश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करतोय. सर्व भारतीय आपापल्या पद्धतीने या स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. भारतातील अनेतक दिग्गजांनी पंतप्रधानांनी आवाहन केलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागही नोंदवला. अशातचं काही भारताबाहेरील क्रिकेटपटूंनीदेखील भारतीय नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत.
या पोस्ट शेअर करणाऱ्यांमध्ये सर्वात प्रमुख नाव आहे ते म्हणजे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर. वॉर्नरचे भारतात मोठ्या प्रमाणावर चाहते असल्याचे अनेकदा जाणवले आहे. याच चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारी एक इंस्टाग्राम पोस्ट वॉर्नरने शेअर केली आहे. त्यात त्याने भारताचा तिरंगा झेंडा शेअर केलाय.
https://www.instagram.com/p/ChRC7-6Lr9x/?utm_source=ig_web_copy_link
डेव्हिड वॉर्नर भारतात खूप लोकप्रिय आहे, तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून बराच काळ खेळला आहे. आता तो दिल्ली कॅपिटल्सचा एक भाग आहे, डेव्हिड वॉर्नरने आपल्या खेळाद्वारे आणि सोशल मीडियावर रीलद्वारे भारतीय चाहत्यांना वेड लावले आहे.
Happy Independence Day India 🇮🇳. The place I played my last international match. #GreatMemories pic.twitter.com/28iRforVJq
— Daren Sammy (@darensammy88) August 14, 2022
याशिवाय वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने देखील आपला फोटो शेअर करत भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आता या दिग्गजांनी केलेल्या या कृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
दरम्यान, अनेक भारतीय दिग्गजांनी आपला तिरंगा झेंड्या सोबतचा फोटो शेअर करत राष्ट्राला अभिवादन केले आहे. विशेष म्हणजे सगळ्यात कमी वेळा सोशल मिडीयवर ऍक्टीव्ह असणाऱ्या भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीयाने सर्वप्रथम आपला इंस्टाग्राम अकाऊंटचा डीपी बदलत तिरंगा झेंडा लावला होता. त्यानंतर त्याचे अनुकरण विराट कोहलीसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी केलं. याशिवाय सचिन तेंडूलकर, इरफान पठाण सह अनेक माजी दिग्गजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे आपापल्या घरावर तिरंगा ध्वर फटकावर स्वातंत्र्यदिन साजरा केला.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधाराने अचानक दिलेला निवृत्तीचा धक्का, सुवर्ण युगाचा झालेला अंत
केएल राहुलमुळे विंडीजच्या दौऱ्यात भन्नाट कामगिरी करण्याऱ्या खेळाडूचा फलंदाजी क्रम धोक्यात!
Independence Day Special | भारताच्या स्वातंत्र्यदिनी जन्मलेले नशीबवान इंडियन क्रिकेटर्स