---Advertisement---

विराटच्या शिलेदाराचा पराक्रम; दोन देशांकडून टी२० विश्वचषक खेळण्याचा केला पराक्रम

---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू डेविड विसेने यंदाच्या टी२० विश्वचषकात खेळून एका आगळ्यावेगळ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तो याआधी दक्षिण आफ्रिकेकडून विश्वचषकात खेळला होता तर यावेळी त्याने नामिबियाकडून मैदानात पाऊल ठेवून इतिहास घडवला. नामिबिया आणि श्रीलंका यांत झालेल्या सामन्यात त्याने हा विक्रम घडवला.

डेविड विसे इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटही खेळतो. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी खेळणे सोडले आहे. त्याच्या वडिलांचा जन्म नामिबियामध्ये झाला होता, म्हणून व्हिसा मिळवून तो खेळण्यास पात्र ठरला आहे. डेविड विसेचा हा दुसरा टी२० विश्वचषक असेल. यापूर्वी २०१६ मध्ये तो दक्षिण आफ्रिकेकडून खेळला होता.

नामिबियासाठी टी२० विश्वचषक संघात सामील होऊन डेविड विसेने या देशासाठी पदार्पण केले आहे. आतापर्यंत त्याने नामिबियाकडून एकही सामना खेळला नव्हता. त्याने मार्च २०१६ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला. त्यानंतर २०१७ मध्ये त्याने इंग्लिश काउंटी संघ ससेक्सकडून खेळण्यास सुरुवात केली. तो परदेशी खेळाडू म्हणून या संघासोबत खेळत होता. तो ‘द हंड्रेड’मध्ये लंडन स्पिरिट संघाचाही भाग होता. दक्षिण आफ्रिकेची अनेक मोठी नावे नामिबियन संघाशी संबंधित आहेत. संघाचे प्रशिक्षक पियरे डी ब्रुयने आहेत, त्यांनी यापूर्वी दक्षिण आफ्रिकन संघ टायटन्सचे प्रशिक्षकपद भूषवले होते. त्याचवेळी, एल्बी मॉर्केल देखील या संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहे.

विसे आयपीएलमध्येही खेळला

डेविड विसे ३६ वर्षांचा आहे पण त्याला टी२० लीगमध्ये मोठी मागणी आहे. तो कॅरेबियन प्रीमियर लीग, पाकिस्तान सुपर लीगमध्ये देखील खेळतो. याशिवाय तो आयपीएलमध्येही खेळला आहे. आयपीएलमध्ये तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा भाग होता आणि दोन हंगामात तो आरसीबीकडून खेळला होता. आयपीएलमध्ये विसेने १५ सामन्यात १६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी ३३ धावांत चार विकेट्स अशी होती. याशिवाय त्याने फलंदाजीतही चांगले योगदान दिले होते. ऑगस्ट २०१३ ते मार्च २०१६ पर्यंत तो दक्षिण आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. या दरम्यान, त्याच्या नावावर सहा वनडे आणि २० टी२० सामने होते. यामधील त्याची कामगिरी चांगली राहिली होती. त्याने  सामन्यात नऊ आणि टी२० मध्ये त्याने २४ विकेट्स घेतल्या आहेत.

नामिबिया पहिल्यांदाच टी -२० विश्वचषक खेळणार आहे. त्यांनी ओमानला हरवून स्पर्धेचे तिकीट जिंकले होते. आफ्रिका खंडातून दक्षिण आफ्रिकेनंतर नामिबिया या स्पर्धेत खेळणारा दुसरा संघ असेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---