---Advertisement---

वर्ल्डकप चालू असताना धक्कादायक बातमी! इंग्लंडच्या स्टार खेळाडूने केली Retirementची घोषणा

On: बुधवार, नोव्हेंबर 1, 2023 2:06 PM
England-Cricket-Team
---Advertisement---

सध्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा थरार सुरू आहे. स्पर्धेने अर्धा टप्पा पार केला आहे. स्पर्धेत आतापर्यंत 31 सामने पार पडले आहेत. अशातच धक्कादायक बातमी समोर येत आहे. इंग्लंड संघाचा 33 वर्षीय खेळाडू डेविड विली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो विश्वचषक 2023 स्पर्धेनंतर निवृत्त होणार आहे. इंग्लंड संघ स्पर्धेत खूपच खराब प्रदर्शन करताना दिसत आहे. त्यांनी 6 सामने खेळले असून 1 सामना जिंकला आहे, तर 5 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. अशात विलीच्या या निर्णयाने क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

इंग्लंड संघाने त्यांच्या नवीन केंद्रीय कराराची घोषणा केल्याच्या एक आठवड्यानंतर डेविड विली (David Willey) याने हे मोठे पाऊल उचलले आहे. विलीचा या केंद्रीय करारात समावेश नाहीये. विलीने 2015मध्ये इंग्लंड संघाकडून आयर्लंडविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने 25 धावा खर्चून 1 विकेटही घेतली होती.

विलीच्या विश्वचषकातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 3 सामने खेळताना 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधून 32 धावाही निघाल्या आहेत.

काय म्हणाला विली?
विशेष म्हणजे, 2019 विश्वचषकात जोफ्रा आर्चरसाठी संघातून वगळण्यापूर्वी विली हा इंग्लंडचा वनडेतील नियमित सदस्य होता. ही स्पर्धा इंग्लंडने जिंकली होती. अशात निवृत्तीविषयी तो म्हणाला की, “हा दिवस यावा असे मला कधीच वाटले नाही. मी लहानपणापासूनच इंग्लंडकडून खेळण्याचे स्वप्न पाहत होतो. त्यामुळे नीट विचार करून, मला खूप खेद वाटतो की, विश्वचषकाच्या शेवटी माझ्यावर सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे.”

विलीची कारकीर्द
डेविड विली याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने इंग्लंड संघाकडून 70 वनडे सामने आणि 43 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने वनडेत गोलंदाजी करताना 5.57च्या इकॉनॉमी रेटने 94 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, टी20त त्याने 8.18च्या इकॉनॉमी रेटने 51 विकेट्स घेतल्या आहेत.

याव्यतिरिक्त त्याच्या फलंदाजीविषयी वनडेत त्याने 627 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतके केली आहेत. तसेच, टी20त त्याने 226 धावा केल्या आहेत. (David Willey Announces his Retirement From International Cricket read fast)

हेही वाचा-
बॉलिवूडच्या अण्णाने जावयालाच दिला धोका! KL Rahul नाही, तर ‘या’ खेळाडूला म्हटले ‘आवडता’ क्रिकेटर
शमीच्या दोनच सामन्यातील कामगिरीने ऑस्ट्रेलियन दिग्गज इम्प्रेस, म्हणाला, ‘शमीने आता सिराजची…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---