---Advertisement---

डेविस कपमध्ये भारताला मिळाला नवा स्टार! दक्षिणेश्वर सुरेशने केली लिएंडर पेससारखी कमाल, निर्णायक सामन्यात विजय

On: सोमवार, फेब्रुवारी 9, 2026 11:38 AM
---Advertisement---

डेविस कप २०२६मध्ये भारतीय संघ उत्तम कामगिरी करत आहे. यामध्ये दक्षिणेश्वर सुरेशच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर भारताने नेदरलॅंड्सला पराभूत करत दुसऱ्या फेरीत जागा पक्की केली आहे. सुमित नागलच्या पराभवानंतर दोन्ही संघाचे गुण २-२ असे झाले होते, यामुळे पाचवा सामना महत्वाचा होता आणि यामध्ये सुरेशने जबरदस्त कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला आहे.

बेंगलोरच्या एसएम कृष्णा स्टेडियममध्ये खेळला गेलेला हा सामना भारतीयांच्या चांगलाच लक्षात राहणार आहे. यामध्ये जागतिक क्रमवारीत ४५७व्या स्थानावर असलेल्या सुरेशने १६२ क्रमांकाच्या गाय डेन औडेनला ६-४, ७ (७)-६(४) असे पराभूत केले. ज्यामुळे भारताने ३-२ असे जिंकत क्वालिफायर्सच्या फेरीत प्रवेश केला आहे. हा भारतासाठी ऐतिहासिक विजय ठरला, कारण २०१९नंतर प्रथमच भारतीय संघाने डेविस कपच्या नव्या आवृत्तीच्या दुसऱ्या फेरीत गेला आहे. पुढील फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरियाशी आहे.

सुरेशचा हा कारकिर्दीतील दुसराच डेविस कप आहे. यामध्ये त्याने दोन्ही एकेरी सामने जिंकले असून युकी भांबरीसोबत दुहेरीमध्येही उत्तम कामगिरी केली. सुरेशच्या या कामगिरीमुळे २००४मध्ये लिएंडर पेसने केलेल्या कामगिरीची आठवण येते. तेव्हा पेसने जपानविरुद्ध तिन्ही सामने जिंकले होते.

औडेनविरुद्धच्या सामना जिंकताच सुरेश कोर्टवर पाठीच्या बळावर पडला आणि बाकी खेळाडू त्याच्याकडे धावले.
यामध्ये दिवसाची सुरूवात १-१ अशी झाली होती. त्यानंतर भांबरी-सुरेश जोडीने डेविड पेल-सॅंडर एरेंड्सविरुद्ध तीन तास चाललेल्या सामन्यात ७-६ (०), ३-६, ७-६ (१) असा विजय मिळवला. हा विजय भारतासाठी महत्वाचा होता, कारण याआधी सुमितने एकेरी सामना गमावला होता. त्याला जॅस्पर डी जोंगने ७-५, १-६, ४-६ असे पराभूत केले. यामुळे भारतासाठी पाचवा सामना महत्वाचा होता.

भारताने १९६६, १९७४ आणि १९८७ मध्ये डेविस कपची अंतिम फेरी गाठली आहे. तसेच भारताने प्रथमच २०१३-१४नंतर सलग तीन डेविस कप सामने जिंकले. २०२५मध्ये टोगोला पराभूत करण्याआधी स्वित्झर्लंडला पराभवाचा धक्का दिला आणि २०२६च्या पात्रता फेरीत स्थान मिळवले. आता २०२४च्या अंतिम फेरीत खेळलेल्या नेदरलॅंड्सचा पराभव केला आहे.

डेविस कप २०२६ पात्रता फेरी, भारत विरुद्ध नेदरलँड्स निकाल

सामना १: गाय डेन औडेनने सुमित नागलचा ६-०, ४-६, ६-३ असा पराभव केला
सामना २: दक्षिणेश्वर सुरेशने जास्पर डी जोंगचा ६-४, ७-५ असा पराभव केला
सामना ३: युकी भांबरी-दक्षिणेश्वर सुरेश जोडीने सँडर एरेंड्स-डेव्हिड पेल जोडीचा ७(७)-६(०), ३-६, ७(७)-६(१) असा पराभव केला
सामना ४: जास्पर डी जोंगने सुमित नागलचा ५-७, ६-१, ६-४ असा पराभव केला
सामना ५: दक्षिणेश्वर सुरेशने गाय डेन औडेनचा ६-४, ७(७)-६(४) असा पराभव केला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---