---Advertisement---

केवळ १५ कसोटींचा अनुभव असूनही भारताविरुद्ध का खतरनाक सिद्ध होईल मलान? घ्या जाणून

On: गुरूवार, ऑगस्ट 19, 2021 10:52 AM
---Advertisement---

हेडिंग्ले| इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिका सध्या रोमांचक टप्प्यात आहे. पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत राहिल्यानंतर चित्तथरारक दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजयी पताका झळकावली. मात्र यजमानांच्या हाती मात्र निराशा लागली. यानंतर येत्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने संघात मोठे बदल केले आहेत. २५ ऑगस्टपासून हेडिंग्ले येथे तिसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात होणार आहे.

या सामन्यात जॅक क्रॉली आणि डोम सिब्ली यांना संघाबाहेर करत डेविड मलानचे पुनरागमनचे झाले आहे. तो तिसऱ्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची दाट शक्यता आहे. मात्र मलानच्या पुनरागमनाने पाहुण्या संघाची चिंता मात्र शिगेला पोहोचली आहे.

भारताविरुद्ध का खतरनाक सिद्ध होऊ शकतो मलान? 
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाणाऱ्या मलानने कसोटी क्रिकेटमध्ये केवळ १५ सामने खेळले आहेत. दरम्यान १४० धावांच्या सर्वोत्कृष्ट खेळीसह त्याने ७२४ धावा केल्या आहेत. तो भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीतून ३ वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करणार आहे. यापूर्वी त्याने ऑगस्ट २०१८ मध्येच भारताविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. हा त्याचा भारताविरुद्धचा एकमेव कसोटी सामना असून यामध्ये त्याने पहिल्या डावात ८ आणि दुसऱ्या डावात २० अशी एकूण २८ धावांची कामगिरी केली होती.

परंतु यानंतर मलानच्या प्रदर्शनात खूप बदल झाले आहेत. भलेही दरम्यानच्या काळात कसोटी स्वरुपात त्याला संधी मिळाली नाही. पण वनडे आणि टी२० क्रिकेटचे मैदान मात्र त्याने गाजवले आहे. मागील ५ टी२० सामन्यांमध्ये त्याने २ अर्धशतके ठोकली आहेत. एवढेच नव्हे तर, भारताविरुद्ध आतापर्यंत ५ टी२० सामने खेळताना त्याने १२० च्या स्ट्राईक रेटने १४८ धावा फटकावल्या आहेत. दरम्यान ६८ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.

त्यामुळे हा फलंदाज घरच्या हेडिंग्ले मैदानावर आक्रमक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांच्या नाकी नऊ आणू असतो.

इंग्लंड संघात झालेत हे बदल
डॉम सिब्ली आणि जॅक क्रॉली यांना इंग्लंड संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे ते आता संघातून बाहेर पडून आपल्या अनुक्रमे वार्विकशायर आणि केंट या काउंटी संघात सामील होतील.

त्याचबरोबर इंग्लंडला तिसऱ्या कसोटीपूर्वी वेगवान गोलंदाज मार्क वूडच्या तंदुरुस्तीची चिंता सतावत आहे. लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी दरम्यान त्याला खांद्याची दुखापत झाली होती. तो जर तिसऱ्या कसोटीपूर्वी तंदुरुस्त झाला नाही, तर त्याच्याऐवजी साकीब महमूद आणि क्रेग ओव्हरटन यांचे पर्याय इंग्लंड संघाकडे आहेत. या दोघांनाही १५ जणांच्या संघात संधी मिळाली आहे.

भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ – 
जो रुट (कर्णधार), रॉरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, सॅम करन, डॅन लॉरेन्स, साकीब मेहमूद, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, मार्क वूड.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---