पुणे | अतितटीच्या लढतीत हेमंत पाटील अकादमी संघाने मध्यप्रदेश संघाला तर हरयाणा संघाने राजस्थान संघाला सहज पराभूत करताना ‘आझम स्पोर्ट्स अकादमी’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पाचव्या आबेदा इनामदार ऑल इंडिया निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धे’तील आपली विजयी आगेकूच कायम राखली.
आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हरयाणा संघाने राजस्थान संघाला ९६ धावांनी पराभूत केले. हरयाणा संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारली. यात भारती कश्यपने दमदार फलंदाजी करताना केवळ ३९ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली. तिला नेहा शर्माने ४८ चेंडूत ४ चौकारांसह ४७ धावा करताना सुरेख साथ दिली.
सोनिका शर्माने ३, वृंदा जुनेजाने २ तर स्वीटी चौहानने एक गडी बाद केला. हरयाणा संघाचे दिलेल्या १५० धावांच्या आव्हानासमोर राजस्थान संघाचा डाव १८.५ षटकांत सर्वाबाद ५४ धावांवर आटोपला. सलामीवीर सोनिका शर्माने सर्वाधिक ११ धावा केल्या. मंजू शर्मा व तनुजा उगीनवाल यांनी प्रत्येकी २ तर सोनिया लोहिया, ज्योती यादव व पूजा टोप्पो यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. भारती कश्यपला सामानावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अतितटीच्या लढतीमध्ये हेमंत पाटील अकादमी संघाने मध्यप्रदेश संघाला ६ गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना मध्यप्रदेश संघाने निर्धारित २० षटकांत १ बाद १३६ धावा केल्या. रिंकी रजकने दमदार ७५ (४८ चेंडू, १२ चौकार) धावांची खेळी केली. अंतरा शर्माने ४० (५२ चेंडू, ४ चौकार) धावा करताना रिंकीला सुरेख साथ दिली. वैष्णवी काळेने १ गडी बाद केला.
हेमंत पाटील अकादमी संघाने १९ षटकांत ४ बाद १३७ धावा करताना विजयी लक्ष्य पार केले. तडाखेबंद खेळी करताना सायली लोणकरने ४८ चेंडूत ७० धावा (१० चौकार) संघाला एकहाती विजय मिळवून दिला. सायलीला तंजीला शेखने २६ चेंडूत ४० धावा (५ चौकार) करताना तिला सुरेख साथ दिली. गगनदीप कौर, कलाशी जेना, अंतरा शर्मा व संगीता रावत यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
सायली लोणकरला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सायली लोणकरला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक : हरयाणा : २० षटकांत ९ बाद १४९ (भारती कश्यप (३९ चेंडू, ८ चौकार), नेहा शर्मा ४७ (४८ चेंडू, ४ चौकार), सोनिका शर्मा ४-०-२३-३, वृंदा जुनेजा ४-०-२६-२, स्वीटी चौहान ४-०-४०-१) विजयी विरुद्ध राजस्थान : १८.५ षटकांत सर्वबाद ५४ (सोनिका शर्मा ११ (१४ चेंडू, १ चौकार) मंजू शर्मा ४-१-९-२, तनुजा उगीनवाल ४-१-१५-२, सोनिया लोहिया ३-०-६-१, ज्योती यादव ४-०-९-१, पूजा टोप्पो ३.५-०-१२-१)
मध्यप्रदेश : २० षटकांत १ बाद १३६ (रिंकी रजक ७५ (४८ चेंडू, १२ चौकार), अंतरा शर्मा ४० (५२ चेंडू, ४ चौकार), वैष्णवी काळे ४-०-३२-१) पराभूत विरुद्ध हेमंत पाटील अकादमी : १९ षटकांत ४ बाद १३७ (सायली लोणकर ७० (४८ चेंडू, १० चौकार), तंजीला शेख ४० (२६ चेंडू, ५ चौकार), गगनदीप कौर ४-०-२३-१, कलाशी जेना ४-०-२२-१, ४-०-२३-१, संगीता रावत ४-०-१७-१)