पुणे | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित 23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत एकतर्फी झालेल्या लढतीत ओएनजीसी संघाने ईआयएल संघाचा 33-17 असा तर एमआरपीएल संघाचा 34-19 असा पराभव करत 6 गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना बास्केटबॉल कोर्ट येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत राऊंड रॉबिन फेरीत ओएनजीसी संघाने ईआयएल संघाचा एकतर्फी लढतीत 33-17 असा पराभव केला.
अमित हूडाने याने केलेल्या खोल चढायांच्या बळावर मध्यंतरापुर्वी ओएनजीसी संघाने 15-6 अशी भक्कम आघाडी घेतली. अमितने 10 चढायांमध्ये 9 गुण मिळवले तर ईआयएल संघाच्या अरविंद व जे.पी यादव याच्या चढायांना निश्प्रभ करत राजेश नरवालने आपल्या लौकीकाला साजेल अशी कामगिरी करत उत्कृष्ट पकडी केल्या व संघाला मोठा विजय मिळवून दिला.
दुस-या लढतीही ओएनजीसी संघाने एमआरपीएल संघाला धुळ चारत 34-19 असा विजय संपादन करून स्पर्धेत 6 गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश केला. दुस-या सामन्यातही अमित हुडा चमकला व त्याने 11 चढायांमध्ये 10 गुण मिळवत संघाला दुस-याही लढतीत मोठा विजय मिळवून दिला.
नवनित गौतमने चलाखीने पकडी करत एमआरपीएल संघाचे मनोबल खच्ची केले व संघाला विजय मिळवून दिला.
ओएनजीसी व बीपीसीएल संघांनी 6 गुणांसह अंतिम फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल-
राऊंट रॉबिन फेरी
ओएनजीसी वि.वि ईआयएल 33-17 (15-6 मध्यांतरापुर्वी)
ओएनजीसी वि.वि एमआरपीएल 34-19(19-10 मध्यांतरापुर्वी)