---Advertisement---

केवळ २ परदेशी खेळाडूंसह मैदानात उतरला दिल्ली कॅपिटल्सचा संघ, ११ वर्षांनंतर घडलं असं काही

On: रविवार, मार्च 27, 2022 5:15 PM
Delhi-Capitals-Team
---Advertisement---

क्रिकेटविश्वातील सर्वात मोठी टी२० लीग, इंडियन प्रीमियर लीगचे बिगूल वाजले आहे. शनिवारपासून (२६ मार्च) आयपीएल २०२२ चा हंगाम सुरू झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलचा उद्घाटन सामना झाल्यानंतर रविवारी (२७ मार्च) पहिला डबल हेडर खेळवला गेला. यातील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमने सामने होते. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली संघाच्या खात्यात अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे.

उभय संघातील (MI vs DC) सामन्यासाठी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.०० वाजता नाणेफेक झाली. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात मुंबईकडून तिलक वर्मा, टीम डेव्हिड, मुरुगन अश्विन, रिली मेरेडीथ आणि टायमल मिल्स यांनी पदार्पण केले आहे. तसेच मुंबईने अंतिम ११ जणांच्या संघात ४ परदेशी खेळाडूंना स्थान दिले आहे. यात टीम डेव्हिड, रिली मेरेडीथ आणि टायमल मिल्स यांच्यासह कायरन पोलार्डचा समावेश आहे.

मात्र दिल्ली संघाने त्यांच्या अंतिम ११ जणांच्या संघामध्ये (Delhi Capitals Playing XI) केवळ २ परदेशी खेळाडूंना स्थान दिले आहे. यात टीम सिफर्ट आणि रोवमन पॉवेल यांचा समावेश आहे. यासह प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ २ परदेशी खेळाडूंना (Only 2 Overseas Players In Playing XI) उतरवणारा दिल्ली केवळ दुसराच संघ ठरला आहे.

दिल्लीरूपी तब्बल ११ वर्षांनंतर आयपीएलमध्ये कोणत्या संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ २ परदेशी खेळाडू घेतले आहेत. यापूर्वी २०११ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात फक्त २ परदेशी खेळाडू अंतिम एकादशमध्ये घेतले होते. जॅक्स कॅलिस आणि ओएन मॉर्गन हे परदेशी खेळाडू त्यावेळी कोलकाता संघाच्या अंतिम ११ जणांचा भाग होते. 

अंतिम ११ जणांचे संघ 
दिल्ली कॅपिटल्स – 
पृथ्वी शॉ, टीम सिफर्ट, मनदीप सिंग, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, खलील अहमद, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी.

मुंबई इंडियन्स – 
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), टिळक वर्मा, अनमोलप्रीत सिंग, कायरन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह, बेसिल थम्पी

महत्त्वाच्या बातम्या – 

जडेजाला चेन्नईचं कर्णधारपद सोपवल्यानंतर पत्नीची खास प्रतिक्रिया; धोनीला धन्यवाद देत म्हणाली, ‘तुम्ही…’

‘या’ ५ गोष्टी सीएसकेच्या पराभवास ठरल्या जबाबदार, उद्घाटन सामन्यात केकेआरने चारली धूळ

आरसीबीच्या ‘या’ कट्टर चाहत्याचे नाही तोड, फ्रँचायझीप्रती प्रेम व्यक्त करताना केले असे काही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---