दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तो टायफाइडमधून बरे होऊन हॉटेलमध्ये परत आला आहे. दिल्ली संघाने रविवारी (दि. १५ मे) ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले नाही की, तो आयपीएल २०२२मध्ये ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड वॉर्नरसोबत उर्वरित २ सामने खेळणार की नाही.
रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला सोमवारी (दि. १६ मे) पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाचा सामना करायचा आहे. यानंतर २१ मे रोजी वानखेडे स्टेडिअममध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाविरुद्ध आयपीएल २०२२मधील शेवटचा सामना खेळला जाईल. संघ सध्या १२ गुणांसोबत आयपीएलच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. तसेच, प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे.
निवेदनात काय म्हणाला दिल्ली कॅपिटल्स संघ?
रविवारी सकाळी दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या निवेदनात म्हणले की, “दिल्ली कॅपिटल्सचा सलामी फलंदाज पृथ्वी शॉला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे, जिथे तो टायफाइड या आजारावर उपचार घेत होता. पृथ्वी शॉ हॉटेलमध्ये परतला आहे. तसेच, तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.”
OFFICIAL UPDATE:
Delhi Capitals opener Prithvi Shaw has been discharged from the hospital where he was being treated for a bout of typhoid. Shaw has returned to the team hotel where he is currently recuperating, while being monitored by the DC medical team. pic.twitter.com/EMJ5NACqpP
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 15, 2022
नुकतेच दिल्ली कॅपिटल्स संघाचा सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन याने संकेत दिले होते की, युवा फलंदाज पृथ्वी शॉ उर्वरित सामन्यांमध्ये सामील होण्याची शक्यता नाहीये.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
पृथ्वी शॉ १ मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध खेळल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली संघात सामील नव्हता. ८ मे रोजी शॉ याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून समजले की, त्याला ताप असून तो रुग्णालयात दाखल होता.
पृथ्वी शॉ याची हंगामातील कामगिरी
पृथ्वी शॉ याने यंदाच्या हंगामात ९ सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने २८.७८च्या सरासरीने २५९ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने २ अर्धशतकेही चोपली आहेत.
आंद्रे रसेलचा हैदराबादविरुद्ध ‘अष्टपैलू’ खेळ, कोलकाताने ५४ धावांनी जिंकली रोमांचक लढत
मंकीगेट प्रकरणामुळे भारतीयांच्या डोक्यात गेला होता एँड्र्यू सायमंड्स, नक्की काय होतं ते प्रकरण?