आयपीएल 2025 मधील 17वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. जो की दिल्ली कॅपिटल्सने 25 धावांनी जिंकाला. सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकून पहिल्या डावात खेळताना मर्यादित 20 षटकात 183 धावा केल्या, लक्ष्याचा पाठलाग करताना, चेन्नई सुपरकिंग्जला केवळ 158 धावा करता आल्या. या पराभवासह दिल्लीने हंगामतील तिसऱ्या विजयाची नोंद केली.
चेन्नईच्या चेपाॅकवर रंगलेल्या या सामन्यात चेन्नईची सपशेल फ्लाॅप कामगिरी पाहायला मिळाली. 184 धावांचा पाठलाग करताना चेन्नईने पाॅवरप्लेमध्ये 3 विकेट्स गमावल्या यामुळे संघ सामन्यात खूप मागे पडला. संघाने दुसऱ्याच षटकात रचिन रवींद्रच्या रुपाने पहिला गडी गमावला. तो केवळ 3 धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार ऋतुराज गायकावड देखील मिचेल स्टार्कचा बळी ठरला. तो 5 धावांवर बाद झाला. तर काॅनवेच्या चेन्नईला पाॅवरप्लेमध्ये तिसरा धक्का बसला. डेव्हाॅन काॅनवे (13) विप्राज निगमचा बळी ठरला.
Mukesh Strikes 🙌🏻
— Star Sports (@StarSportsIndia) April 5, 2025
Mukesh Kumar uses the bounce to perfection and dismisses #RachinRavindra with a sharp return catch!
Just the kind of start #DC needed!
Watch LIVE ➡ https://t.co/4Kn2OwL1UW#IPLonJioStar 👉 #CSKvDC, LIVE NOW on Star Sports 2, Star Sports 2 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/AB8jKrvwqZ
यानंतर विजय शंकर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने 69 धावा केल्या पण यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट फक्त 127.78 होता.
जेव्हा 184 धावांचे मोठे लक्ष्य समोर होते तेव्हा विजय शंकरला जलद फलंदाजी करण्याची आवश्यकता होती. पण त्याने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 43 चेंडू घेतले. चेन्नईला शेवटच्या 5 षटकांत विजयासाठी 78 धावांची आवश्यकता होती, विजय शंकर सेट असूनही तो मोठे फटके मारू शकला. पण शंकरने डेथ ओव्हर्समध्ये निराशाजनक कामगिरी केली. एमएस धोनीने देखील खूप संथ फलंदाजी केली. त्याने 26 चेंडूत केवळ 30 धावा केल्या. आशाप्रकारे दिल्ली कॅपिटल्सने सामना 25 धावांनी जिंकला.