दिल्ली कॅपिटल्स संघाचा युवा कर्णधार रिषभ पंत हा नेहमीच मैदानात असताना आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. फलंदाजी करत असताना तो तुफान फटकेबाजी करून मनोरंजन करतो. तर यष्टीरक्षण करताना फलंदाजांची पायखेची करून किंवा समालोचन करून मनोरंजन करत असतो. एमएस धोनीचा हा शिष्य आपल्या गुरूच्या पावलांवर पाऊल ठेऊन पुढे जात आहे. गुरुवारी (२९ एप्रिल) झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात रिषभ पंतने अक्षर पटेलला असे काही म्हटले होते की, त्याच्या पुढच्याच चेंडूवर फलंदाज बाद झाला होता.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच फलंदाजी करण्यासाठी आलेला दिनेश कार्तिक संघासाठी चांगली कामगिरी करण्याच्या वाटेवर असताना रिषभ पंतने अक्षर पटेलला गोलंदाजी करण्यासाठी बोलावले होते. या षटकात दिनेश कार्तिक स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात होता.
तेव्हा रिषभने अक्षरला सूचना देत म्हटले होते की, “अरे थोडा दूर ठेव, हा तर आधीपासूनच स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात आहे. तू तुझ्या हिशोबाने याला शॉट खेळू दे.” त्यानंतर पुढच्या चेंडूवर कार्तिकने स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि दिनेश कार्तिक पायचीत झाला होता. अक्षर पटेलने जोरदार मागणी केली असता अंपायरने बाद घोषित केले होते. त्यांनतर कार्तिकने डीआरएस घेतला असता तो स्पष्टपणे बाद आहे असे दिसून आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Rishabh Pant @RishabhPant17 from behind the wicket: pic.twitter.com/UrggGV5Nui
— Shashank Shekhar Jha (@shashank_ssj) April 29, 2021
या सामन्यात रिषभ पंतने उत्कृष्ट यष्टीरक्षण केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याने नितीश राणाला यष्टीचित करत माघारी धाडले होते. तसेच तो कर्णधाराची भूमिका देखील योग्यरीत्या पार पाडत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यात ५ वेळेस विजय मिळवला आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघ विजय मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने २० षटक अखेर ६ बाद १५४ धावा केल्या होत्या. यामध्ये आंद्रे रसलने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली होती. तर शुबमन गिलने देखील ४३ धावांचे योगदान दिले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पृथ्वी शॉने सर्वाधिक ८२ धावांची खेळी केली होती. तसेच शिखर धवनने ४६ धावांची खेळी केली होती. हा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘माही’चा जबरा फॅन असलेला ‘हा’ युवा धुरंधर घराच्या छतावर करतोय सराव, सीएसकेकडून खेळण्याचे आहे स्वप्न
भावा आजूबाजूला पाहायचं ना! रिषभ पंतचा ‘पॅन्टलेस अवतार’ कॅमेरात कैद, नेटकऱ्यांनी घेतली मजा
चेंडू सीमापार गेल्याने शिवम चिडला सॅमसनवर, मग कर्णधारानेही दिले असे उत्तर, पाहा त्या घटनेचा व्हिडिओ