महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्या हंगामाला क्रिकेटप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. या डब्ल्यूपीएल स्पर्धेतील पाचवा सामना दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध यूपी वॉरियर्झ संघात खेळला गेला. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात दिल्लीने शानदार विजय मिळवला. विशेष म्हणजे, दिल्लीचा हा सलग दुसरा विजय होता. मात्र, हा सामना गमावल्यानंतर यूपीची कर्णधार एलिसा हिली हिने पराभवाचे कारण सांगत तिने स्वत:विषयी खंतही व्यक्त केली.
या सामन्यात यूपी वॉरियर्झ (UP Warriorz) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय दिल्ली कॅपिटल्स महिला (Delhi Capitals Women) संघाने चुकीचा सिद्ध करून टाकला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावत 211 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना यूपीला निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 169 धावाच करता आल्या. त्यामुळे दिल्लीने हा सामना 42 धावांनी खिशात घातला.
सामना गमावल्यानंतर यूपी वॉरियर्झची कर्णधार एलिसा हिली (Alyssa Healy) हिने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, “हेच तर टी20 क्रिकेट आहे. आम्ही शेवटच्या 5 षटकात 65 धावा दिल्या. तसेच, पॉवरप्लेमध्ये 3 विकेट्स गमावल्या. आमच्या पराभवाचं हे एक मोठं कारण राहिलं की, आम्ही बऱ्याच ठिकाणी धावा दिल्या. मात्र, ताहलिया मॅकग्राने बॅटमधून चांगली कामगिरी केली. तसेच, संघाला आव्हानाचा पाठलाग करण्यात मोलाचे योगदान दिले. आम्हाला माहिती होते की, वादळी फलंदाजी करावी लागेल. मीदेखील त्या षटकात जोनासनविरुद्ध कमकुवत पडले होते. सकारात्मक बाब अशी की, आम्ही खूप चांगल्या गोष्टी करत आहोत. मात्र, यांसारख्या स्पर्धांमध्ये छोट्या गोष्टी ठीक करणे खूपच कठीण असते. आम्ही या चुका नक्की सुधारू.”
Make that 2️⃣ in 2️⃣ for @DelhiCapitals 💪
Tahlia McGrath fought hard with a magnificent 90*(50) but it's #DC who win the contest by 42 runs in the end 👏👏
Scorecard 👉 https://t.co/Yp7UtgDSsl#TATAWPL | #DCvUPW pic.twitter.com/aS7mllgqLb
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 7, 2023
यूपीचा डाव
खरं तर, 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यूपी संघाकडून तालिया मॅकग्रा (Tahlia McGrath) हिने डाव सांभाळत नाबाद 90 धावा चोपल्या. या धावा तिने 50 चेंडूंचा सामना करत 4 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने चोपल्या. तिच्याव्यतिरिक्त एकालाही मोठी खेळी करत आली नाही. असे असूनही ताहलियाची ही वादळी खेळी यूपीला विजय मिळवून देऊ शकली नाही. दिल्लीने हा सामना सहजरीत्या 42 धावांनी काबीज केला. या विजयानंतर दिल्ली गुणतालिकेत 4 गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. (dc vs up delhi capitals beat up warriors by 42 runs losing captain alyssa healy said this)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीचा धडाका कायम! युपीला नामोहरम करत मिळवला सलग दुसरा विजय, मॅकग्राची एकाकी झुंज
बुरा ना मानो होली है! आरसीबीच्या विदेशी खेळाडू रंगल्या धूळवडीच्या रंगात, स्मृतीने…