---Advertisement---

चिडका शमी! धवनने नको म्हटले असतानाही मुद्दाम टाकला चेंडू अन् पडला तोंडघशी, बघा व्हिडिओ

---Advertisement---

पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवारी (१८ एप्रिल) मुंबईत झालेला आयपीएल २०२१ चा अकरावा सामना अतिशय चुरसीचा ठरला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ४ विकेट्सच्या मोबदल्यात १९५ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १८.२ षटकात ४ विकेट्स गमावत सहज त्यांचे लक्ष्य पार केले आणि ६ विकेट्सने सामना खिशात घातला. दरम्यान पंजाबचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याचे चिडके रुप पाहायला मिळाले.

झाले असे की, पंजाबच्या १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीची सलामी जोडी, पृथ्वी शॉ आणि शिखर धवन मैदानावर उतरले होते. अशात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने वेगवान गोलंदाज शमीकडे डावातील दुसरे षटक सोपवले. शमीच्या षटकातील पहिले दोन चेंडू डॉट राहिले.

त्यानंतर शमीने पुढील तिसरा चेंडू टाकण्यासाठी धाव घेतली. तत्पुर्वी आपण फलंदाजीस तयार नसल्याचे सांगण्यासाठी धवन शांत उभा होता. तरीही शमी धावत आला. हे पाहून धवनही यष्टीसमोरुन मागे सरकला आणि शमीकडे एकटक पाहू लागला. चिडक्या शमीने धवनच्या नकारानंतरही चेंडू टाकत त्याचा त्रिफळा उडवण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू यष्टीला न लागता टप्पा घेऊन मागे यष्टीरक्षकच्या राहुलच्या हाती गेला. हे पाहून धवनही थोडाफार चिडल्याचे पाहायला मिळाले.

https://twitter.com/lodulalit001/status/1383826615898034177?s=20

अखेर पंचांनी तो डेड बॉल असल्याचे करार केले आणि शमीला पुन्हा चेंडू टाकण्यास सांगितले गेले. शमीला चिडलेले पाहून समालोचकही हसू लागले. सोशल मीडियावर त्याच्या या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शमीच्या या सामन्यातील गोलंदाजीविषयी बोलायचे झाले तर, त्याने अतिशय महागडी गोलंदाजी केली. ४ षटके टाकताना तब्बल ५३ धावा त्याने दिल्या. दरम्यान त्याला प्रतिस्पर्धी दिल्ली संघाचा एकही फलंदाज बाद करण्यात यश आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

सुपर डॅडी! ‘मिस्टर ३६०’ची चौकार-षटकारांची आतिषबाजी, पत्नी अन् मुलीच्या रिऍक्शनने दर्शकांचे वेधले लक्ष

मॅक्सवेलचं अर्धशतक अन् विराटकडून टाळ्यांच्या गजरात अभिनंदन, व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

हिम्मत तर पाहा गड्याची! अर्शदीपने धवनपुढेच केली त्याच्या सेलिब्रेशनची ‘कॉपी’, एकदा व्हिडिओ पाहाच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---