---Advertisement---

शेवटच्या चेंडूत संघाने सामनाही गमावला, आता कॅप्टनला बसला लाखोंचा भुर्दंड

On: बुधवार, जानेवारी 28, 2026 12:06 PM
---Advertisement---

महिला आयपीएल अर्थातच डब्ल्यूपीएलमध्ये मंगळवारी (२७ जानेवारी) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात वडोदरा येथे सामना खेळला गेला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात गुजरातने विजय मिळवला. दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी हा सामना जिंकणे महत्वाचे होते. दिल्लीने हा सामना गमावला आणि त्यानंतर त्यांची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जला मोठा दंडही बसला.

डब्ल्यूपीलच्या नियमानुसार, दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार जेमिना रॉड्रिग्जला सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेट ठेवल्याने दंड ठोठावण्यात आला आहे. असा प्रकार तिच्याकडून पहिल्यांदाच घडला असून डब्ल्यूपीएलच्या आचारसंहितेनुसार तिला १२ लाख रुपयांना दंड बसला आहे.

दिल्ली या पराभवानंतर गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. ते मागील दोन्ही सामने जिंकत दुसऱ्या स्थानावर होते. त्यांनी आता ७ सामन्यात खेळताना ४ सामने गमावले असून ३ सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचा एक फेब्रुवारीला होणारा सामना प्लेऑफमध्ये टिकण्याच्या रुपात शेवटची संधी असणार आहे. हा सामना युपी वॉरियर्स विरुद्ध असणार आहेत.

सामना गमावला असला तरी त्यांचे खेळाडू उत्तम खेळले. विशेषकरून स्नेह राणा आणि निकी प्रसाद असे मत जेमिमाने सामन्यानंतर व्यक्त केले.

या सामन्यात गुजरातने दिल्लीसमोर विजयासाठी १७५ धावसंख्येचे लक्ष्य ठेवले होते. स्नेह आणि निकीने सातव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. जी डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील सातव्या विकेटसाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. यामध्ये स्नेहने १५ चेंडूत २९ धावा आणि निकीने २४ चेंडूत ४७ धावा केल्या होत्या.

हा सामना दिल्लीच्या बाजूने कलल्याचे दिसत होते, मात्र गुजरातच्या सोफी डिवाईनने तिच्या अप्रतिम कामगिरीने संघाला विजय मिळवून दिला. तिने शेवटच्या षटकात विजयासाठी ९ धावांची आवश्यकता असताना केवळ ५ धावा दिल्या. हा सामना गुजरातने ३ धावांनी जिंकला. या विजयामुळे गुजरात गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---