दिल्ली| आज आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स असा सामना होणार आहे. दिल्लीचा संघ आज नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. हा सामना फिरोजशहा कोटला येथे खेळला जाणार आहे.
दिल्लीचा हा 7वा सामना आहे. आधीच्या 6 पैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवलेली दिल्ली गुणतालिकेत सगळ्यात शेवटी आहे. कोलकाताचा संघ 6 पैकी तीन विजय मिळवून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
याआधी इडन गार्डनवर कोलकाता बरोबर झालेल्या सामन्यात कोलकाताने दिल्लीचा 71 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात कोलकाताने दिल्लीसमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
कोलकाताकडे दिनेश कार्तिक (6 सामन्यात 194 धावा ), रॉबीन उथप्पा(6 सामन्यात 162 धावा ), ख्रिस लीन (6 सामन्यात 181 धावा ) असे फलंदाज आहे.
गोलंदाजीत सुनिल नारायन, पियुष चावला आणि कुलदिप यादव हे तीन फिरकी गोलंदाज कोटलावर विकेट्स घेण्यात यशस्वी ठरतील.
दिल्लीकडे फलंदाजीत कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत हे दोघे सोडून बाकीच्यांची कामगिरी सुमार आहे.
गोलंदाजीत लियाम प्लकेंटने आयपीएलच्या पदार्पणातच 17 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या. तर ट्रेंट बोल्ट (6 सामन्यात 9 विकेट्स) हा दिल्लीकडून जास्त बळी घेणारा गोलंदाज आहे. हे दोघे नवीन चेंडूने सामना पालटू शकतात.
आजतरी दिल्ली पराभवाची मालिका खंडित करणार का ?
कधी होईल आयपीएल २०१८ दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स सामना ?
दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये आयपीएल 2018 चा 26 वा सामना आज, 27 एप्रिलला होणार आहे.
कुठे होईल आयपीएल २०१८ मधील दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना?
दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आजचा सामना फिरोजशहा कोटला स्टेडियम, दिल्ली येथे होईल.
किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स सामना?
आयपीएल २०१८ मधील दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स सामना आज रात्री ८.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री ७.३० वाजता होईल.
कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.
आयपीएल २०१८ मधील दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.
यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:
दिल्ली डेअरडेविल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, अवेश खान, रिषभ पंत , गौतम गंभीर, ग्लेन मॅक्सवेल, अमित शर्मा, शहाबाज नदीम, विजय शंकर, मोहम्मद शमी, ट्रेंट बोल्ट, जेसन रॉय, डॅन ख्रिस्टन, कॉलिन मुन्रो, नमन ओझा, ख्रिस मॉरीस, राहूल टेवातिया, हर्षल पटेल, पृथ्वी शॉ, जयंत यादव, संदीप लामिचाने, मन्जोत कालरा, लियाम प्लकेंट
कोलकाता नाईट रायडर्स: दिनेश कार्तिक (कर्णधार),रॉबीन उथप्पा, आंद्रे रसेल, ख्रिस लीन, पियुष चावला, कुलदिप यादव, मिशेल जॉन्सन, सुनिल नारायन, शुभम गील, इशांक जग्गी, कमलेश नागरकोती, नितीश राणा, विनय कुमार, अपुर्व वानखाडे, रिंकू सिंग, शिवम मवी, जॅवोन सर्लस, कॅमरॉन डेलपोर्ट, टॉम कुरान