---Advertisement---

PHOTO: क्विंटन डी काॅक बनला बाप माणूस, नवजात परीचा नावासह शेअर केलाय फोटो

On: गुरूवार, जानेवारी 6, 2022 8:49 PM
de kock test
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा वरिष्ठ यष्टिरक्षक फलंदाज व माजी कर्णधार क्विंटन डी कॉक गुरुवारी (६ जानेवारी) पिता बनला. त्याची पत्नी साशा हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांनी या मुलीचे कियारा असे नामकरण केले. डी कॉकने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून एक सुंदर छायाचित्र पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

डी कॉकने दिली माहिती
डी कॉकने पत्नी व नवजात बाळासह छायाचित्र पोस्ट केले. त्याने याला कॅप्शन लिहिले. ‘कसे आहात, माझे नाव कियारा’
त्याच्या या छायाचित्राला चाहत्यांची पसंती मिळत आहे. तसेच, अनेक चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत.

https://www.instagram.com/p/CYY-fXIMA_U/?utm_medium=copy_link

नुकतीच स्वीकारले कसोटीतून निवृत्ती
क्विंटन डी कॉक याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. सध्या दक्षिण आफ्रिका संघ भारतीय संघासह कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाच्या पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर डी कॉकने अचानक आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे घोषित केले होते. माध्यमातील वृत्तानुसार, तो आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी पत्नीसह राहण्यास इच्छुक होता‌. मात्र, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने यासाठी त्याला परवानगी दिली नव्हती. याच कारणाने त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---