जोहान्सबर्ग। भारताने पहिल्या टी २० सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २८ धावांनी विजय मिळवला आहे. भारतीय संघाचा आजपर्यंतचा हा सर्वात यशस्वी परदेश दौरा ठरणार आहे.
या दौऱ्यात जरी संघ कसोटी मालिका २-१ ने पराभूत झाला असला तरीही वनडे मालिका ५-१ जिंकत जोरदार कमबॅक केले तर टी२० मालिकेत संघ १-० असा आघाडीवर आहे.
डेल स्टेन:
भारतीय संघाच्या अफलातून कामगिरी बरोबरच दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंच्या दुखापतीही याला कारणीभूत ठरल्या. यात डेल स्टेन डाव्या टाचेमूळे पहिल्या कसोटीतून बाहेर गेला. तो १ मार्च पासून सूरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरूद्ध आॅस्टे्ॅलिया मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात परत संघात येवू शकतो.
टेंबा बवूमा:
भारताविरुद्ध पहिल्या २ कसोटीत संघात स्थान न मिळालेला टेंबा बवूमा तिसऱ्या सामन्यापूर्वी बोटाच्या दुखापतीमूळे संघाबाहेर गेला. तोही १ मार्च पासून सूरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरूद्ध आॅस्टे्ॅलिया मालिकेतील दूसऱ्या कसोटी सामन्यात परत संघात येवू शकतो.
एबी डे विलीयर्स:
भारताविरुद्ध झालेल्या ६व्या वनडेत दुखापतग्रस्त झाल्यामूळे एबी डे विलीयर्सला टी२० मालिकेला मुकावे लागले. गुडग्याला झालेल्या दुखापतीमूळे तो मालिकेतुन बाहेर गेला. १ मार्च पासून सूरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरूद्ध आॅस्टे्ॅलिया मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात तो परत संघात येवू शकतो.
क्वींटन डीका्ॅक:
भारताविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडेत डाव्या मनगटाला झालेल्या दुखापतीमूळे क्वींटन डीका्ॅक वनडे आणि टी२० मालिकेतून बाहेर पडला होता. या दुखापतीमधून तो आता बऱ्यापैकी सावरला असून तो दक्षिण आफ्रिका विरूद्ध आॅस्टे्ॅलिया मालिकेत पहिल्या कसोटीत कमबॅक करण्याची शक्यता अाहे.
फाफ डू प्लेसी:
दक्षिण आफ्रिका विरूद्ध आॅस्टे्ॅलिया कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेची खरी मदार अाहे ती कर्णधार फाफ डू प्लेसीवर. कसोटी मालिकेनंतर बोटाच्या दुखापतीमूळे संघाबाहेर गेला. तो दक्षिण आफ्रिका विरूद्ध आॅस्टे्ॅलिया मालिकेत पहिल्या कसोटीत कमबॅक करण्याची शक्यता अाहे.