पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज आझम खान सध्या कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) 2024 मध्ये खेळत आहे. तो गयाना ॲमेझॉन वॉरियर्सचा भाग आहे.
आझम खान अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्सविरुद्धच्या सामन्यात अतिशय विचित्र पद्धतीनं बाद झाला. त्यानं अष्टपैलू शमर स्प्रिंगरला जणूकाही आपली विकेट गिफ्टच केली. स्प्रिंगरनं टाकलेला एक बाउन्सर मानेवर आदळल्यानं आझम खान स्तब्ध झाला होता. काही वेळ त्याच्यासोबत काय घडलं, ते आझमला समजलंच नाही.
डावाच्या 12 व्या षटकात ही घटना घडली. गयानाच्या संघासमोर विजासाठी 169 धावांचं लक्ष्य होतं. आझम खान पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. 12व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्यानं एकही धाव घेतली नाही. दुसऱ्या चेंडूवर त्यानं चौकार मारला. यानंतर स्प्रिंगरनं तिसरा चेंडू बाउन्सर टाकला, ज्यावर 26 वर्षीय आझम अडखळला.
या चेंडूवर आझमनं लेग साइडला शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ येऊन त्याच्या मानेला लागला. चेंडू लागल्यानंतर आझम वेदनेनं त्रस्त होऊन खाली बसला आणि त्यानं लगेचच आपली मान धरली. या दरम्यान चेंडू स्टंपवर जाऊन आदळला, ज्याकडे त्यानं लक्षच दिलं नाही. यामुळे आझम खान बाद झाला. आझमनं 9 चेंडूंचा सामना करत 9 धावा केल्या, ज्यात एका चौकाराचा समावेश होता.
— Cricket Cricket (@cricket543210) August 31, 2024
गयाना विरुद्ध अँटिग्वा सामना अतिशय रोमांचक झाला. सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. अँटिग्वाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर शेवटच्या षटकात 16 धावांचा बचाव करू शकला नाही. ड्वेन प्रिटोरियसनं आमिरची धुलाई करत गयानाला तीन गडी राखून विजय मिळवून दिला. त्यानं आमिरच्या अखेरच्या षटकात 3 चौकार आणि 1 षटकार लगावला.
हेही वाचा –
आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये होणार मोठे बदल! बीसीसीआय या दोन नियमांचा आढावा घेणार
राहुल द्रविडच्या मुलाचा टीम इंडियात प्रवेश; ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी संघाची घोषणा
यूएस ओपनमध्ये आणखी एक अपसेट, गतविजेता नोवाक जोकोविच तिसऱ्या फेरीतूनच बाहेर