ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUSvSA) यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यावरून क्रिकेटवर्तुळात नव्या वादाला सुरूवात झाली आहे. पाच दिवसांचा हा सामना केवळ दोनच दिवसात कसा काय संपतो? असे प्रश्न विचारले जात आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. हा सामना शनिवारी (17 डिसेंबर) सुरू झाला होता आणि रविवारी (18 डिसेंबर) तो संपला. त्यानंतर आता खुद्द पराभूत संघाचा कर्णधार डीन एल्गर याने या सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात चाहत्यांना मनोरंजक सामन्याची अपेक्षा होती. मात्र, सामना दोन दिवस देखील खेळला गेला नाही. साडेपाच सत्रांमध्येच सामन्याचा निकाल लागला. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन वेळा फलंदाजी केली व 114 षटकात तब्बल 34 फलंदाज बाद झाले. यातील 34 पैकी 26 फलंदाजांना दुहेरी आकडा देखील गाठता आला नव्हता.
या सामन्यानंतर बोलताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर म्हणाला,
“ही खेळपट्टी नक्कीच धोकादायक होती. या खेळपट्टीवर फलंदाजी करण्याबाबत मी पंचांना विचारले देखील होते. दोन दिवसात 34 गडी बाद होत आहेत. हा कसोटी क्रिकेटचा चांगला प्रचार वाटतो का? आपण कसोटी क्रिकेट पाच दिवस चालावे अशी अपेक्षा करत असतो. दोन संघातील केवळ तीन फलंदाज ज्यावेळी फलंदाजी करण्यात यशस्वी होतात, त्यावेळी समजते की खेळपट्टी कशा स्वरूपाची होती.”
या सामन्यात वेगवान गोलंदाजांचे चांगलेच वर्चस्व राहिले. कगिसो रबाडा, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स व एन्रिक नॉर्किए यांचे अनेक चेंडू धोकादायकरित्या खेळपट्टीवर उसळत होते. अनेक माजी क्रिकेटपटूंनी देखील या खेळपट्टीवर टीका केली आहे.
dean elgar angry on pitch in brisbane test
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार का? पत्रकार परिषदेत केएल राहुलने केला खुलासा
कसोटीमध्ये अक्षर पटेलचा बोलबाला, भारताच्या क्रिकेट इतिहासात केली कोरले आपले नाव