सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (centurion) मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ११३ धावांनी विजय मिळवला आहे. यासह कसोटी मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्यात पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने आपल्या खेळाडूंचे कौतुक केले आहे.( Dean Elgar statement on defeat against India)
हा सामना झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने (Dean Elgar) म्हटले की, “आम्ही या सामन्यात अनेक ठिकाणी चुका केल्या. तर भारतीय खेळाडूंनी या सामन्यात अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. भारतीय सलामीवीर फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली होती. तसेच तिसऱ्या दिवशी आमच्या गोलंदाजांनी देखील चांगली गोलंदाजी केली होती. त्यांनी चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली होती. परंतु, आमच्या फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. आम्हाला काही गोष्टींचा विचार करावा लागेल.”
डीन एल्गरने पहिल्या डावात १ धाव, तर दुसऱ्या डावात ७७ धावांची खेळी केली होती.
दुसऱ्या डावात डीन एल्गर जोपर्यंत खेळपट्टीवर होता, तोपर्यंत सामना बरोबरीत होता. परंतु, तो बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ पूर्णपणे बॅकफूटवर आला. याबाबत बोलताना डीन एल्गर म्हणाला की, “या सामन्यात पराभूत होणं खूप निराशाजनक आहे. परंतु, अनेक गोष्टी आहेत, ज्या आमच्यासाठी सकारात्मक ठरल्या आणि पुढे आम्हाला कामी येतील. मला तर वाटते की, फलंदाजीमुळे दोन्ही संघांमध्ये फरक पडला आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत आम्हाला पुनरागमन करून दिले.”
भारतीय संघाचा जोरदार विजय
या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने ३२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाला अवघ्या १९७ धावा करण्यात यश आले होते. त्यानंतर भारतीय संघाला १३० धावांची मोठी आघाडी मिळाली होती. ही आघाडी घेत भारतीय संघाने दुसऱ्या डावात १७४ धावा केल्या होत्या. तसेच दक्षिण आफ्रिका संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३०५ धावांचे आव्हान दिले होते. परंतु, दक्षिण आफ्रिका संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १९९ धावांवर संपुष्टात आला. हा सामना भारतीय संघाने ११३ धावांनी आपल्या नावावर केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
रणजी ट्रॉफीसाठी तमिळनाडू संघाच्या नेतृत्त्वाची धुरा विजय शंकरकडे, ३ नव्या चेहऱ्यांनाही संधी
हे नक्की पाहा :