---Advertisement---

INSvsRSA: द. आफ्रिकन कर्णधाराची टीम इंडियाला चेतावणी; म्हणाला, ‘डी कॉक गेल्याचा आम्हाला फरक…’

Dean Elgar
---Advertisement---

सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गच्या मैदानावर सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ११३ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज क्विंटन डी कॉकने (Quinton dekock retirement)  कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर (Dean Elgar)  याने क्विंटन डी कॉकच्या निवृत्तीबद्दल मोठे भाष्य करत, भारतीय संघाला चेतावणी दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने म्हटले की, “मी खूप आश्चर्यचकित झालो होतो. परंतु जेव्हा मी त्याच्यासोबत बसलो तेव्हा त्याने मला हा निर्णय घेण्यामागचं कारण सांगितलं. मी त्याच्या निर्णयाचा आदर करतो आणि समजू शकतो. ”

तसेच तो पुढे म्हणाला की, “मला वाटत नाही की कोणत्याही खेळाडूवर याचा परिणाम होईल. आता आंतरराष्ट्रीय खेळाडूंप्रमाणे काम करून पुढे जाण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही सध्या कसोटी मालिकेच्या मध्यावर आहोत, त्यामुळे डी कॉकच्या निवृत्तीचा कोणावरही परिणाम होईल असे मला वाटत नाही.”

“खेळाडू परिस्थितीचा आदर करतात. आम्हाला असे वाटते की, अलीकडच्या काळात आम्हाला अनेक धक्के बसले आहेत. मला वाटत नाही की क्विंटन डी कॉकच्या निवृत्तीने खेळाडूंना अजूनही धक्का बसला आहे. मला असे वाटत नाही की, त्याचा निर्णय पुढे जाऊन कसोटी क्रिकेटला अडचणीत टाकेल. निवृत्ती घेण्यासाठी त्याच्याकडे कारण आणि पर्याय होते. एक संघ म्हणून आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो आणि संघ म्हणून आम्हाला हे विसरून पुढे जावं लागेल,” असे डीन एल्गार म्हणाला.

मालिकेतील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गच्या मैदानावर सुरू आहे. या कसोटी सामन्यात क्विंटन डी कॉकऐवजी काइल व्हेरेनेला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने २ कसोटी सामन्यात १३.० च्या सरासरीने ३९ धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

RSA v IND 2nd Test Live : टाॅस जिंकून भारताचा बॅटींगचा निर्णय, विराटशिवाय खेळणार टीम इंडिया; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

बिग ब्रेकिंग! विराट कोहली जोहान्सबर्ग कसोटीतून बाहेर, आता ‘हा’ शिलेदार करणार नेतृत्व

हे नक्की पाहा:

हे आहेत भारतीय गोलंदाज, पण फलंदाजी करताना कसोटीत केलंय शतक | Indian Bowlers Who Made Test Century

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---