पुणे। फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी तर्फे आयोजित व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत डेक्कन चार्जर्स संघाने लायन्स संघाचा तर, टायगर्स संघाने महाराष्ट्र मंडळ संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात डेक्कन चार्जर्स संघाने लायन्स संघाचा 24-08 असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. सामन्यात 100अधिक गटात डेक्कन चार्जर्सच्या आशिष पुंगलिया व पद्माकर कर्वे यांनी लायन्सच्या रोहन दळवी व राजू साठे यांचा 6-4 असा तर, 90 अधिक गटात डेक्कन चार्जर्सच्या अमोद वाकलकर व मदन गोखले यांनी लायन्सच्या अमित नाटेकर व राहुल मुथा यांचा 6-1 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर खुल्या गटात डेक्कन चार्जर्सच्या ऋषिकेश पाटसकर व रक्षय ठक्कर यांनी लायन्सच्या नरहर गर्गे व रघुनंदन बेहरे यांचा 6-1 असा पराभव करून ही आघाडी अधिक भक्कम केली. अखेरच्या खुल्या गटाच्या लढतीत आशिष पुंगलियाने मुकुंद जोशीच्या साथीत लायन्सच्या रोहन दळवी व ध्रुव मेड यांचा 6-2 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत प्रशांत गोसावी, ऋतू कुलकर्णी, परज नाटेकर, योगेश पंतसचिव, केदार शहा, अभिषेक ताम्हाणे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर टायगर्स संघाने महाराष्ट्र मंडळ संघाचा 20-07 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
निकाल: उपांत्य फेरी:
डेक्कन चार्जर्स वि.वि.लायन्स 24-08(100अधिक गट: आशिष पुंगलिया/पद्माकर कर्वे वि.वि.रोहन दळवी/राजू साठे 6-4; 90 अधिक गट: अमोद वाकलकर/मदन गोखले वि.वि.अमित नाटेकर/राहुल मुथा 6-1; खुला गट: ऋषिकेश पाटसकर/रक्षय ठक्कर वि.वि.नरहर गर्गे/रघुनंदन बेहरे 6-1; खुला गट: आशिष पुंगलिया/मुकुंद जोशी वि.वि.रोहन दळवी/ध्रुव मेड 6-2);
टायगर्स वि.वि.महाराष्ट्र मंडळ 20-07(100अधिक गट: प्रशांत गोसावी/ऋतू कुलकर्णी वि.वि.कमलेश बचलू/विकास बचलू 6-0; 90अधिक गट: परज नाटेकर/योगेश पंतसचिव वि.वि.राजेंद्र देशमुख/महेश जाधव 6-1; खुला गट: केदार शहा/अभिषेक ताम्हाणे वि.वि.धरणीधार मिश्रा/महेश जाधव 6-0; खुला गट: अनुप मिंडा/अमित लाटे पराभूत वि.आकाश खैरे/अभिषेक चव्हाण 2-6).
महत्त्वाच्या बातम्या –
आर्यन पम्प्स एमएसएलटीए १५०००डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धा: भारताच्या झील देसाई हिला अग्रमानांकन
पीवायसीच्या वतीने स्नूकरसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित
आयएसएल: जमशेदपूरचा डबल धमाका; प्ले-ऑफ फेरीवर शिक्कामोर्तब