पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिससंघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पीवायस क, डेक्कन ड, एफसी अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत इलाईट डिव्हिजन गटात साखळी फेरीत चुरशीच्या झालेल्या सामन्यात डेक्कन ड संघाने सोलारीस आरपीटीएचा सुपरटायब्रेकमध्ये 18-17असा संघर्षपूर्ण पराभव केला. सामन्यात 100 अधिक गटात डेक्कनच्या राजीव पागे व विभाश वैद्य या जोडीला सोलारीसच्या रविंद्र पांडे व नाम जोशी यांनी 3-6असे पराभूत केले.
त्यांनतर खुल्या गटात डेक्कनच्या विभाश वैद्य व जितेंद्र जोशी यांनी सोलारीसच्या संजीव घोलप व जयंत पवार यांचा टायब्रेकमध्ये 6-5(9-7) असा तर, 90 अधिक गटात डेक्कनच्या अजय जाधव व संजय कामत यांनी सोलारिसच्या सचिन खिलारे व राजेंद्र देशमुख यांचा 6-0असा पराभव करून संघाला 15-11 अशी आघाडी मिळवून दिली. खुल्या गटात डेक्कनच्या अदित्य खटोड व पराग देसाई या जोडीला सोलारीसच्या रविंद्र पांडे व हेमंत भोसले यांनी 2-6असे पराभूत केले.
दुसऱ्या सामन्यात पीवायस क संघाने एमडब्ल्युटीए क संघाचा 24-10असा पराभव केला. विजयी संघाकडून अनुप मिंडा, शैलेश ढोरे, संदिप नाचरे, अमित नाटेकर,सारंग पाबळकर, योगेश पंतसचिव, वरूण मागीकर यांनी सुरेख कामगिरी केली. अन्य लढतीत एफसी अ संघाने बालेवाडी ब संघावर 20-15अशा फरकाने विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी: इलाईट डिव्हिजन
पीवायस क वि.वि एमडब्ल्युटीए क- 24-10(100 अधिक गट- अनुप मिंडा/शैलेश ढोरे वि.वि.राजाराम कृष्णास्वामी/अजय चौहान 6-2, खुला गट- अनुपमिंडा/संदिप नाचरे वि.वि.पार्थ मोहपात्रा/अंकित डागीया 6-5(8-6); 90 अधिक गट- अमित नाटेकर/सारंग पाबळकर वि.वि.रिझवान शेख/सलिम वाडीवाला 6-0, खुला गट- योगेश पंतसचिव/वरूण मागीकर वि.वि.अजय चौहान/ विक्रम गुलानी 6-2)
डेक्कन ड वि.वि. सोलारीस आरपीटीए- 18-17(100 अधिक गट- राजीव पागे/विभाश वैद्य पराभूत वि रविंद्र पांडे/नाम जोशी 3-6, खुला गट- विभाश वैद्य/जितेंद्र जोशी वि.वि. संजीव घोलप/जयंत पवार 6-5(9-7); 90 अधिक गट- अजय जाधव/संजय कामत वि.वि. सचिन खिलारे/राजेंद्र देशमुख 6-0, खुला गट- अदित्य खटोड/पराग देसाई पराभूत वि रविंद्र पांडे/हेमंत भोसले 2-6)
एफसी अ वि.वि. बालेवाडी ब – 20-15(100 अधिक गट- पुष्कर पेशवा/संजय रासकर वि.वि. खन्ना / सुनिल 6-1, खुला गट- गणेश देवखीले/आदित्य अभ्यंकर वि.वि संदिप/जोर्ज 6-5(7-5); 90 अधिक गट- पंकज यादव/ राजेश देसाई पराभूत वि.नरेंद्र सोपल/ दत्ता धोंगडे 2-6, खुला गट- धनंजय कवडे/सुमित सातोसकर वि.वि. सुनिल/अतुल 6-3)