अबुधाबी येथे खेळल्या गेलेल्या अबुधाबी टी10 लीगच्या सहाव्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी (4 डिसेंबर) खेळला गेला. शेख झायेद स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात गतविजेत्या डेक्कन ग्लॅडिएटर्स संघाने न्यूयॉर्क स्ट्रायकर्स संघाचा 37 धावांनी पराभव करत आपले विजेतेपद राखले. कर्णधार निकोलस पूरन व अष्टपैलू डेव्हिड विजे या विजयाचे नायक ठरले.
DECCAN GLADIATORS HAVE RETAINED THEIR #ABUDHABIT10 TITLE 🏆🔥
#InAbuDhabi #CricketsFastestFormat pic.twitter.com/SF6P39UCTR
— T10 Global (@T10League) December 4, 2022
बारा दिवस चाललेल्या या स्पर्धेत शानदार खेळ दाखवत डेक्कन ग्लॅडिएटर्सने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती. तर, प्रथमच स्पर्धेत सहभागी झालेल्या न्यूयॉर्क स्ट्रायकर्स संघाने अनुभवी कायरन पोलार्ड याच्या नेतृत्वात अंतिम फेरी गाठलेली. या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या डेक्कन संघाची सुरुवात तितकीशी चांगली राहिली नाही. सलामीला आलेला सुरेश रैना, टॉम कोहलर व दिग्गज अष्टपैलू आंद्रे रसेल हे 5 षटकात 54 धावा धावफलकावर असताना तंबूत परतले.
संघ अडचणीत असताना डावाची जबाबदारी कर्णधार निकोलस पूरन व डेव्हिड विजे यांनी आपल्या खांद्यावर घेतली. या जोडीने पुढील पाच षटकात 74 धावा कुटत संघाची धावसंख्या 128 पर्यंत नेली. पूरनने 23 चेंडूवर 40 तर विसेने 18 चेंडूत नाबाद 43 धावा तडकावल्या.
या धावांचा पाठलाग करताना न्यूयॉर्क संघ धावांची अपेक्षित गती राखू शकला नाही. डेक्कन संघाने अप्रतिम गोलंदाजी करत न्यूयॉर्कला केवळ 91 धावांवर रोखले. त्याचवेळी न्यूयॉर्कचा कर्णधार कायरन पोलार्ड हा 23 धावांवर दुखापतग्रस्त होऊन बाहेर गेला. त्यामुळे न्यूयॉर्कच्या आव्हानातील हवा निघून गेली. डेक्कन ग्लॅडिएटर्स संघाचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे. निकोलस पूरन याला स्पर्धेचा मानकरी घोषित करण्यात आले. तसेच, भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना हा आणखी एका स्पर्धेच्या विजेत्या संघाचा सदस्य बनला.
(Deccan Gladiators Won Abudhabi T10 League 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
या तीन कारणांनी अडले टीम इंडियाचे घोडे! बांगलादेशने दिली न भरून येणारी जखम
उर्वशी रौतेलाने अखेर मौन सोडले; म्हणाली ‘आरपी’ म्हणजे माझा…