---Advertisement---

लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवशी दिपक चाहरला पत्नीने दिल्या खास शुभेच्छा! पोस्ट शेअर करत लिहीले, ‘HBD…’

On: रविवार, ऑगस्ट 7, 2022 5:02 PM
Deepak-Chahar-And-His-Wife
---Advertisement---

वेगवान गोलंदाज दिपक चाहर आज त्याचा ३०वा वाढद्वस साजरा करत आहे. दिपक चाहरने आपल्या गोलंदाजीने अनेक दिग्गज फलंदाजांना अडचणीत आणले आहे. आयपीएलमधून आपल्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या दिपकने आपल्या शानदार गोलंदाजीमुळे टीम इंडियातही स्थान मिळवले. अलीकडेच दिपकने त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत दीर्घकाळ संबंध ठेवल्यानंतर आग्रा येथे लग्न केले. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जया हिने एक प्रेमळ व्हिडिओ शेअर करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

यंदाच्या आयपीएलमध्ये १४ कोटींमध्ये विकला गेलेला दिपक चाहर दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्जकडून एकही सामना खेळू शकला नाही. यानंतर त्याने त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत आग्रा येथील हॉटेलमध्ये लग्न केले. आज तिच्या पतीच्या वाढदिवशी जयाने तिच्या सोशल मीडियावर एक प्रेमाने भरलेला व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत तिने पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेशही लिहिला.

https://www.instagram.com/reel/Cg8bLsbDxuq/?utm_source=ig_web_copy_link

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “माझ्या जोडीदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही तुमच्या उत्कटतेने, उत्साहाने आणि शिस्तीने मला दररोज प्रेरणा देता, केवळ तुमच्या करिअरसाठीच नाही तर तुमच्या कुटुंबासाठीही. मी स्वत:ला भाग्यवान समजते आणि तू नेहमी असाच हसत राहावा हीच इच्छा आहे.”

दुखापतीमुळे दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर असलेला दिपक चाहर आज आपला ३०वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र, दुखापत झाल्यानंतर आता तो संघात पुनरागमन करणार आहे. दीपकची झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवड झाली असून आशिया चषकासाठीही त्याची निवड होऊ शकते. शिवाय नुकतीच दिपकने त्याच्या फिटनेसबाबत अपडेट देताना आता तो भारतीय संघात पुनरागमनासाठी पुर्णपणे फिट आण तयार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दिपक आता आगामी टी-२० विस्वचषकात देखील संघात सामील होण्यास सज्ज आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

CWG BREAKING: ट्रिपल जंपमध्ये ‘पॉल-अब्दुल्ला’ने रचला इतिहास! गोल्ड-सिल्वर भारताच्याच नावे

तुमसे ना हो पाएगा! दीपक हुड्डाच्या ‘फ्लॉप शो’मुळे भडकले फॅन्स, घेतला चांगलाच समाचार

खुद्द पंतप्रधानांनी ज्याचं कौतुक केलं, तो बीड जिल्ह्याचा अविनाश साबळे आहे तरी कोण?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---