एशिया कप (Asia Cup) २०२२साठी भारतीय संघ जाहीर झाला. १५ जणांच्या या संघात जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल यांचा समावेश नाही. दोघेही दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकले आहेत. तर केएल राहुल आणि विराट कोहली यांचे संघपुनरागमन झाले आहे. मात्र माध्यामातील काही रिपोर्ट्सनुसार संघात बदल होण्याची शक्यता आहे. स्टॅंडबायवर ठेवलेल्या दीपक चाहरला संघात जागा मिळण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे मागील ६ महिन्यांपासून क्रिकेपासून दूर असलेल्या चाहरला नेमके एशिया कपमध्ये संधी मिळणार तरी कशी आणि तो संघात आल्यावर कोणाची जागा असेल धोक्यात ते पाहुया.
दीपक चाहर खेळणार एशिया कप
दीपक चाहर (Deepak Chahar) भारताच्या या वेगवान गोलंदाजाची झिम्बाब्वे दौऱ्यात संघामध्ये निवड झाली आहे. तर एशिया कपमध्ये स्टॅंडबायवर ठेवलेल्या या खेळाडूला अंतिम १५ जणाच्या संघात जागा मिळू शकते. त्याने जर झिम्बाब्वे दौऱ्यात उत्तम कामगिरी केली तर आवेश खानच्या जागी त्याची संघात वर्णी लागू शकते. दीपक हा पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी करतो. तसेच तो फलंदाजीही करू शकल्याने भारताला फायदा आहे.
बुमराहच्या अनुपस्थितीत चाहर हा एक चांगला पर्याय
जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) हा पाठिच्या दुखापतीमुळे एशिया कपमध्ये खेळणार नाही. अशात भारतीय संघाने दीपकला संघात घेतले तर संघ आणखी मजबूत बनेल. निवड समितीच्या एका सदस्याने इनसाइडस्पोर्ट्सशी बोलताना म्हटले, दीपक चाहर हा दुखापतीतून परतत असल्याने त्याचे एशिया कपसाठी थेट संघात निवड झाली नाही. या स्पर्धेआधी एक बदल करण्याची संधी आमच्याकडे आहे. दीपकची झिम्बाब्वे दौऱ्यासाठीच्या संघात निवड झाली आहे. त्याने या दौऱ्यात चांगली कामगिरी केली तर त्याला एशिया कपसाठी संघात घेण्याबाबत विचार केला जाऊ शकतो.
दीपक सध्या पूर्णपणे फिट आहे. त्याने आपल्या फिटनेसविषयी माहिती देताना म्हणाला, मी पूर्णपणे फिट आहे. मी वेस्ट इंडिज विरुद्धही खेळण्यास तयार होतो. मात्र फिटनेसची टक्केवारी ११० करत आणखी फिट होण्याचा विचार केला.
दीपकने २० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच आठव्या किंवा त्याखालील क्रमांकावर त्याची फलंदाजीही विशेष आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘प्रसिद्धीसाठी खोटं बोलतेस, माझ्या मागे लागू नको’, उर्वशी रौतेलाला रिषभ पंतने ऐकवली खरीखोटी
मुंबईपाठोपाठ सीएसकेची विदेशी टी२० लीगमध्ये गुंतवणूक, ‘या’ नावाने ओळखली जाणार नवी फ्रँचायझी
Asia Cup| ‘रोहित आणि टीम’ला द्यावी लागणार फिटनेस टेस्ट, ‘या’ दिवशी दुबईसाठी भरतील उड्डाण