आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. शुक्रवारी (१५ एप्रिल) आयपीएलने याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. अशात आता संपूर्ण हंगामातून बाहेर झाल्यामुळे सीएसके फ्रँचायझीसह चाहरलाही मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. त्याला मेगा लिलावात मिळालेले १४ कोटी गमवावे लागू शकतात.
सीएसकेने (Chennai Super Kings) बेंगलोरमध्ये झालेल्या मेगा लिलावात १४ कोटी रुपयांमध्ये (14 Crore) चाहरला विकत घेतले होते. तो मुंबई इंडियन्सच्या इशान किशननंतर पंधराव्या हंगामातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू बनला होता. परंतु आता तो एकही सामना खेळू शकणार नसल्याने त्याला हाती आलेले १४ कोटी गमवावे (Deepak Chahar May Loose 14 Crore) लागू शकतात.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
दीपक चाहरला का मिळणार नाहीत पैसे?
लिलावात मिळणारी किंमत एका वर्षासाठी असते. उदाहर्णार्थ, जर एखाद्या खेळाडूला लिलावात १४ कोटींना विकत घेतले जात असेल, तर त्याला दरवर्षी ती रक्कम मिळते. अर्थात चाहरला ३ वर्षांचे मिळून ४२ कोटी रुपये मिळाले असते. परंतु जर कोणता खेळाडू पूर्ण हंगामासाठी उपलब्ध असेल, तरच त्याला हे पैसे मिळतात. मग त्याने हंगामातील किती सामने खेळले, किती नाही, याचा जास्त विचार केला जात नाही.
२०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा विशेषज्ञ ग्लेन मॅक्सवेलला मुंबई इंडियन्सने जवळपास ६ कोटींना विकत घेतले होते. परंतु तो या हंगामात केवळ ३ सामने खेळू शकला होता. तरीही त्याला पूर्ण पैसे दिले गेले होते. परंतु जक एखादा खेळाडू हंगाम सुरू होण्यापूर्वीच दुखापतग्रस्त झाला असेल, तर फ्रँचायझी त्याला एकही रुपया देत नाही.
माध्यमांतील वृत्तांनुसार, जर कोणता खेळाडू हंगामातील निश्चित सामन्यांसाठीच उपलब्ध असेल, तर त्याला एकूण किंमतीच्या १० टक्के पैसे दिले जातात. जर कोणता खेळाडू संघाच्या कँपमध्ये सहभागी झाला असेल आणि हंगाम सुरू होण्यापूर्वी दुखापतग्रस्त झाला असेल व एकही सामना खेळणार नसेल, तर त्याला लिलावातील किंमतीच्या ५० टक्के पैसे दिले जातात. जर कोणता खेळाडू हंगामादरम्यान दुखापतग्रस्त झाला असेल, तर फ्रँचायझी त्याच्या उपचाराचा पूर्ण खर्च करते.
आता चाहर सीएसकेच्या (Chennai Super Kings) कँपमध्ये सहभागी न होता संपूर्ण हंगामातून (Deepak Chahar Ruled Out Of IPL 2022) बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याला या हंगामाचे १४ कोटी गमवावे लागू शकतात.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
MI vs LSG| रोहितचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय; मुंबईकडून ‘या’ खेळाडूचे पदार्पण, पाहा प्लेइंग इलेव्हन
देश बदलला, पण तिथेही पुजाराची हाराकिरी सुरूच! १५ चेंडूत ‘इतक्या’ धावा करत झालाय बाद
‘खूप थकल्यासारखं वाटतंय’, श्रेयस अय्यरने हैदराबादविरुद्धच्या पराभवामागील कारण केले स्पष्ट