दुबई। गुरुवारी (७ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पंजाब किंग्सविरुद्ध ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. असे असले तरी, या सामन्यानंतर चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरचीच सर्वाधिक चर्चा झाली. त्यामागे कारण म्हणजे या सामन्यानंतर दीपकने त्याच्या प्रेयसीला लग्नाची मागणी घातल तिच्याशी साखरपुडा केला. त्यानंतर ती कोण आहे याबद्दल चर्चा सुरु झाली.
दीपकच्या बहिणीकडून ‘तिच्या’ नावाचा खुलासा
दीपक चाहरने स्टेडियममध्ये ज्या मुलीशी साखरपुडा केला, ती मुलगी नक्की कोण आहे, याबद्दल चाहत्यांकडून विचारणा होत होती. अनेकांनी ती परदेशी आहे का, असाही प्रश्न विचारला होता. अखेर दीपची बहीण मालती चाहरने दीपकच्या प्रेयसीच्या नावाचा खुलासा केला आहे.
दीपकने साखरपुडा केल्यानंतर मालतीने सोशल मीडियावर नव्या जोडीचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की ‘आणि माझा भावाचा साखरपुडा झाला. पाहा वहिनी मिळाली. ती जया भारद्वाज आहे आणि ती परदेशी नाही. ती दिल्लीची मुलगी आहे. तुमच्या दोघांना देव आशीर्वाद देवो.’
या पोस्टमुळे दीपकने ज्या मुलीसोबत साखरपुडा केला, तिचे नाव जया भारद्वाज असल्याचे उघड झाले.
https://www.instagram.com/p/CUuzsnbM8mE/
कोण आहे जया भारद्वाज?
जया भारद्वाज ही बिग बॉस ५ मधील स्पर्धक सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे. सिद्धार्थ व्हीजे मॉडल आणि एमटीव्ही स्प्लिट्सविलाचा विजेता देखील राहिला आहे. तसेच त्याने फिअर फॅक्टर खतरो के खिलाडीच्या ६ व्या हंगामात देखील सहभाग नोंदवला होता. जया ही दिल्लीची असून ती कॉर्पोरेट क्षेत्रात काम करते.
जया आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी दीपकसह युएईला आली होती. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा होत्या.
स्टेडियममध्ये दीपकने घातली जयाला मागणी
चेन्नई विरुद्ध पंजाब सामना संपताच दीपक खेळाडूंचे कुटुंबिय बसतात त्या स्टँडमध्ये गेला आणि त्याने सर्वांसमोर तिथे काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या जयाला गुडघ्यावर बसून लग्नाची मागणी घातली. तिनेही क्षणाचाही विलंब न करता त्याच्या मागणीला होकार दिला. तिने होकार दिल्यानंतर दीपकने तिच्या बोटात अंगठी घातली. त्यानंतर त्याने त्याच्या खिशातून आणखी एक अंगठी काढून तिच्याकडे दिली. तिने ती दीपकच्या बोटात घातली.
या क्षणाला दीपकने खास क्षण म्हटले आहे. तसेच या गोड क्षणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Special and one of the best moment of my life #love pic.twitter.com/jsCEhiAUZY
— Deepak chahar 🇮🇳 (@deepak_chahar9) October 7, 2021
A special moment for @deepak_chahar9! 💍 💛
Heartiest congratulations! 👏 👏#VIVOIPL | #CSKvPBKS | @ChennaiIPL pic.twitter.com/tLB4DyIGLo
— IndianPremierLeague (@IPL) October 7, 2021
चेन्नईचा पराभव
या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना फाफ डू प्लेसिसने केलेल्या ७६ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ६ बाद १३४ धावा केल्या होत्या. त्यानंतर १३५ धावांचा पाठलाग पंजाबने १३ षटकांतच पूर्ण केला. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक नाबाद ९८ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
कॅप्टन्स इनिंग! वीरूचा विक्रम मोडत राहुलने ‘या’ यादीत पटकावले दुसरे स्थान
आयपीएल रणांगणात अशी कामगिरी करणारा एकमेवाद्वितीय फलंदाज बनला ‘क्लासी राहुल’