गेल्या काही कालावधीपासून भारतीय संघातील अनेक खेळाडू एका पाठोपाठ अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे भारताच्या संघ व्यवस्थापनाला थोडीफार चिंता सतावत आहे. याशिवाय ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये आयसीसी टी२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे. यासाठीही संघ तयार करायचा आहे. अशातचं आता भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय संघातील महत्वाचा खेळाडू दुखापतीतून सावरला असून लवकरच खेळताना दिसेल अशी बातमी भारताचा माजी फिरकीपटू अमित मिश्रा याने शेअर केली आहे.
भारतीय संघाचा वेगवान स्विंग गोलंदाज दीपक चहर गेल्या काही कालावधीपासून दुखापतीने ग्रस्त आहे. याच कारणाने तो आयपीएल २०२२मध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. मात्र आता चहर दुखापतीतून सावरला असून खेळण्यालसाठी फिट आहे. आणि लवकरच तो भारतासाठी आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळताना दिसेल अशी माहिती अमित मिश्राने एक ट्वीट शेअर करत दिली आहे. अमित मिश्राने दीपक चहरसोबतच्या सराव सत्राचा फोटो शेअर केला आणि लिहिले आहे की, “चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी…. दीपक तंदुरुस्त आहे आणि लवकरच टीम इंडिया आणि सीएसकेकडून खेळण्यासाठी तयार आहे.”
Good news for CSK’ fans.. 😉
He is fit and very soon will be ready for team India and CSK. Wishing you all the very best @deepak_chahar9. ♥️👍 pic.twitter.com/GkL7uDh4dI
— Amit Mishra (@MishiAmit) July 29, 2022
दीपक सहा महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे
दीपक चहर फेब्रुवारीपासून टीम इंडियातून बाहेर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेदरम्यान २९ वर्षीय वेगवान गोलंदाजाला दुखापत झाली होती. या दुखापतीसाठी दीपक नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रिहॅब करत होता. यादरम्यान त्यांना पाठीला दुखापत झाली. या कारणास्तव तो आयपीएल २०२२ खेळला नाही. त्याला चेन्नई सुपर किंग्जने१४ कोटींना विकत घेतले. पण, त्याला न खेळवल्यामुळे चेन्नईचे मोठे नुकसान झाले आणि या हंगामात संघ पिछाडीवर असल्याचे सिद्ध झाले. आयपीएलनंतर दीपक दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धची मालिकाही खेळू शकला नव्हता. मात्र, आता तो तंदुरुस्त आहे. टी-२० विश्वचषकाच्या ३ महिने आधी त्याचे फिट असणे ही टीम इंडियासाठी चांगली बातमी आहे. त्याच्या पुनरागमनामुळे भारतीय गोलंदाजी मजबूत होईल.
दीपक आशिया कपमध्ये खेळू शकतो
गेल्या आठवड्यात ‘द टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत दीपकने स्वत:हून बरे झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर तो म्हणाला, “मी माझ्या बरे झाल्याबद्दल आनंदी आहे. झिम्बाब्वे दौरा आणि आशियाई चषक स्पर्धेसाठी संघात स्थान निश्चित करेन असे मला वाटते. मी येथे एनसीएमध्येही गोलंदाजी करत आहे आणि गोलंदाजी करताना मला पूर्वीपेक्षा खूप बरे वाटते.”
दरम्यान, दीपक चहर भारतासाठी एकुण २० टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये गोलंदाजी करताना त्याने ८.२७च्या इकॉनॉमीने २६ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ७ धावा देत ६ विकेट्स अशी आहे. ही आजवरच्या टी२० इतिहासातील कोणत्याही गोलंदाजाने केलेली सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. विशेष म्हणजे दीपक चहरने ही कामगिरी रोहित शर्मा याच्याच नेतृत्वाखाली केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘ती असती तर आम्ही…’, पहिल्या टी२० पराभवानंतर रेणूका सिंगने व्यक्त केलं दु:ख
कार्तिकच्या अंगात संचारली ‘कॅरेबियन पॉवर!’ विंडीज संघाविरुद्ध ‘एवढ्या’ स्ट्राईक रेटने केल्या धावा
WIvsIND। भारताच्या ‘या’ ४ शिलेदारांची साथ, रोहित आर्मीने केली विंडीजवर मात!