आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ म्हणून चेन्नई सुपर किंग्ज संघाची ओळख आहे. ३ वेळेस आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या या संघाला आयपीएल २०२० मध्ये साजेशी कामगिरी करण्यात यश आले होते. दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघात अनेक युवा प्रतिभावान खेळाडू देखील आहेत, जे आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करून संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावत आहेत. या संघातील वेगवान गोलंदाज दीपक चाहर हा मैदानावर भल्याभल्या फलंदाजांच्या दांड्या उडवताना दिसून येतो. तसेच त्याची बहीण देखील काही कमी नाही, सौंदर्याच्या बाबतीत ती देखील मोठ-मोठ्या अभिनेत्रींना मागे टाकू शकते.
https://www.instagram.com/p/B-HMwvTgSKV/
दिपक चाहर हा येत्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच त्याची बहीण मालती चाहर हिने देखील मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ४ लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स असलेल्या मालतीने, २०१८ मध्ये अनेकदा चेन्नई सुपर किंग्ज संघाला समर्थन करण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. तिचे सौंदर्य पाहून लोकांनी तिला सोशल मीडियावर शोधायला सुरुवात केली होती. त्यानंतर सर्वत्र तिची चर्चा होऊ लागली होती यानंतर ती रातोरात स्टार झाली होती.
https://www.instagram.com/p/CCtKKxigO5G/
वय वर्षे २९ असलेली मालती एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तसेच ती एक अभिनेत्री आणि मॉडेल देखील आहे. तिने २०१८ मध्ये ‘जिनियस’ या चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती ‘साड्डा जलवा ‘ या गाजलेल्या गाण्यात देखील झळकली होती. मालती सोशल मीडियावर देखील प्रचंड ऍक्टिव्ह असते. तिचे इंस्टाग्रामवर जवळपास ४ लाखांपेक्षा ही अधिक फॉलोवर्स आहेत.
https://www.instagram.com/p/B0LMaX9AX4N/
सौंदर्याने परिपूर्ण असलेली मालती ही २०१४ मध्ये झालेल्या ‘एफबीबी फेमिना मिस इंडिया’ दिल्ली येथे ती तिसऱ्या क्रमांकावर होती. अनेक चाहते तिच्या सौंदर्याचे दिवाणे आहेत. मालतीला क्रिकेटमध्ये ही तितकाच रस आहे. तीने अनेकदा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर क्रिकेटचे व्हिडिओज देखील शेअर केले आहेत.
https://www.instagram.com/p/B0dZ4vaAsRz/
तसेच आपला भाऊ दीपक चाहरच्यासोबत देखील तिने अनेक फोटो शेअर केले आहेत. याशिवाय अनेकदा तिने चेन्नईच्या सामन्यांसाठी मैदानावर हजेरी लावलेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
साल १९९० मध्ये आयपीएल झाली असती तर ‘हे’ भारतीय खेळाडू झाले असते मालामाल
असे २ पाकिस्तानी खेळाडू, ज्यांना संधी मिळाली असती तर गाजवलं असतं आयपीएलचं मैदान






