प्रो कबड्डीच्या ५ व्या मोसमामध्ये पुणेरी पलटणचा कर्णधार दीपक निवास हुड्डाने चांगली कामगिरी केली आहे. त्याला उत्तम संघ मिळाला असला तरी संघ बांधणीमध्ये आणि खेळाडूंच्या जागा पक्क्या करण्यामध्ये त्याची प्रशिक्षक बि.सी.रमेशना मोलाची साथ मिळाली आहे.
या मोसमामध्ये दीपकला पुणेरी पलटणने रिटेन केले होते. दीपक रेडींग आणि डिफेन्स दोन्ही पातळ्यांवर संघाला आपली उपयुक्तता दाखवत असतो. ४ ऑगस्ट रोजी झालेल्या पुणेरी पलटण विरुद्ध दबंग दिल्ली सामन्यापूर्वी त्याच्या नावावर एकूण ३९६ गुण होते. या सामन्यात ७ गुण मिळवले आणि ४०० गुणांचा टप्पा ओलांडला आणि एकुण ४०३ गुण झाले. या उत्तम कामगिरीमुळे तो अनुप कुमार, राहुल चौधरी, काशीलिंग आडके आणि मंजीत चिल्लर यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
प्रो कबड्डीमध्ये दीपक हुड्डा हा फक्त पाचवा खेळाडू बनला ज्याने ४०० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. या यादीत राहुल चौधरी ५६२ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
पहा टॉप ५ गुण मिळवणारे खेळाडू:
१ राहुल चौधरी – ५६२
२ अनुप कुमार – ४३२
३ काशीलिंग आडके – ४१५
४ मंजीत चिल्लर – ४०४
५ दीपक निवास हुड्डा – ४०३
तर मंजीत आणि दीपक मागील दोन मोसम पुणेरी पलटण संघासाठी खेळायचे. या वर्षी दीपकला पुणेरी पलटण संघाने रिटेन केले आहे. या दोन खेळाडूंमध्ये फक्त १ गुणाचा फरक आहे.