कबड्डी

प्रो कबड्डीमध्ये अशी कामगिरी करणारा दीपक हुडा केवळ चौथा कबड्डीपटू

पुणे। प्रो कबड्डीच्या सहव्या मोसमात शुक्रवारी (23 नोव्हेंबर) दुसरा सामना जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध पुणेरी पलटन यांच्यात पार पडला. हा सामना 30-30 असा बरोबरीचा झाला. या रोमांचकारी झालेल्या सामन्यात जयपूर पिंक पँथरचा अष्टपैलू कबड्डीपटू दीपक हुडाने खास विक्रम केला आहे.

त्याने या सामन्यात 11 रेड पॉइंट्स मिळवले. त्याचबरोबर त्याने प्रो कबड्डीमध्ये 600 रेड पॉइंट्स मिळवण्याचा टप्पाही पार केला आहे. हा विक्रम त्याने त्याच्या 93 व्या सामन्यात केला आहे.

त्याचे आता प्रो कबड्डीत 93 सामन्यात 609 रेड पॉइंट्स झाले आहेत. याआधी प्रो कबड्डीमध्ये 600 पॉइंट्स पूर्ण करण्याचा विक्रम परदीप नरवाल, राहुल चौधरी आणि अजय ठाकूर यांनी केला आहे. त्यामुळे दीपक हुडा हा विक्रम करणारा चौथा खेळाडू ठरला आहे.

प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक रेड पॉइंट्स मिळवणारे कबड्डीपटू:

760 – परदीप नरवाल (76 सामने)

744 – राहुल चौधरी (89 सामने)

654 – अजय ठाकूर (93 सामने)

609 – दीपक हुडा (93 सामने)

544 – काशिलिंग अडके (83 सामने)

महत्त्वाच्या बातम्या:

पवनकुमार शेरावतला आज प्रो कबड्डीत मोठा विक्रम करण्याची संधी

बंगळूरु बुल्सचा कर्णधार रोहित कुमारचा प्रो कबड्डीमध्ये मोठा पराक्रम

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा