---Advertisement---

आयपीएलनंतर आता दीपक हुडा-कृणाल पंड्या डोमेस्टिक क्रिकेटही खेळणार एकत्र?

Deepak-Hooda-And-Krunal-Pandya
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम सुरू झाल्यापासून दीपक हुडा आणि कृणाल पंड्या यांच्याबद्दल चर्चा होत होत्या. हे दोघेही हा हंगाम लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना दिसत आहेत. मात्र गेल्यावर्षी या दोघांमध्ये वडोदरा संघात असताना वाद झाले होते. त्यानंतरही हे वाद विसरून हे दोघेही आयपीएलमध्ये एकत्र खेळताना दिसत आहेत. पण, या दरम्यान दीपक हुडाने वडोदरा संघाची साथ सोडली, पण आता वडोदरा क्रिकेट संघ (बीसीए) दीपक हुडाला परत येण्याची आणि संघाकडून पुन्हा स्थानिक सामने खेळण्याची विनवणी करत असल्याची माहिती समोर येत आहे. 

साल २०२२-२१ च्या देशांतर्गत हंगामावेळी कर्णधार कृणाल पंड्या आणि दीपक हुडा यांच्यात काही कारणावरून विवाद झाला होता. पंड्याशी झालेल्या विवादानंतर हुडा राजस्थान संघा कडून खेळण्यासाठी निघून गेला होता. पण सध्या त्या दोघांचेही विवाद संपले असून ते एकाच आयपीएल संघाकडून खेळत आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीएचे अधिकारी हुडाला संघात परत येण्याची मागणी करत आहे.

यामध्ये बीसीएचे अधिकारी म्हणाले की, “आम्ही हुडाला संघात परत येण्याची विनंती केली आहे. त्याचे आणि पंड्याचे मतभेद दूर झाले असून त्या दोघांध्ये आता सगळे ठीक आहे. यामुळे त्याला संघात परत न येण्याचे कोणतेच कारण आता उरले नाही आहे. तसेच याआधीही आम्ही त्याला परत बोलावले होते. पण आता संघात यायचे की नाही हा त्याचा निर्णय आहे.”

“हुडाने सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. तर हे आयपीएल झाल्यावर तो ठरवणार आहे”, असेही बीसीएचे अधिकारी पुढे म्हणाले. हुडा आणि पंड्या आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायट्ंसकडून खेळत आहेत.

पंड्या-हुडा प्रकरण नेमके काय होते?
मागील वर्षीच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेपूर्वी पंड्याशी झालेल्या भांडणानंतर हुडाने बायो-बबल सोडले होते. यावेळी त्याला पंड्याने धमकी दिली होती की तो पुन्हा वडोदरा संघाकडून नाही खेळू शकणार, असा आरोप हुडाने लावला होता. यानंतर त्याने राजस्थान संघाकडून सामने खेळले.

आयपीएल २०२२च्या हंगामासाठी लिलावामध्ये लखनऊने हुडाला ५.७५ करोड आणि पंड्याला ८.२५ करोडमध्ये विकत घेतले आहे.

तसेच वडोदरा संघ फलंदाजी मजबूत करण्याचा विचार करत आहे. त्यांची मागील स्थानिक हंगामाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली असून ते कोणत्याच स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचले नव्हते.

त्याचबरोबर नुकतेच हुडाची भारतीय संघात निवड झाली आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या आगामी पाच टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. हुडाने वडोदराकडून खेळताना ४६ प्रथम श्रेणी सामन्यात ४३च्या सरासरीने २९०८ धावा केल्या आहेत.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्स अप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘दिनेश कार्तिकला परत संधी दिली, मग शिखर धवनला का नाही’, दिग्गज भारतीय क्रिकेटपटूचा प्रश्न

गॅलॅक्टिकचे सहा गोल, तर संघवी एफसीची बरोबरी

एमएसएलटीए सुहाना स्मार्ट टेनिस सर्किट स्पर्धेत मुंबईच्या तमन्ना नायर, आरव छल्लाणी यांना विजेतेपद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---