भारतीय संघाचा अष्टपैलू दीपक हुड्डाची टी२० प्रकारातील कामगिरी चमकदार ठरत आहे. त्याची फलंदाजी पाहून अनेक माजी क्रिकेटपटू त्याला विराट कोहलीच्या जागेवर टी२० विश्वचषकात खेळवावे, अशी मागणी करत आहेत. तो फलंदाजी बरोबरच गोलंदाजीही करत असल्याने ती संघासाठी जमेची बाजू ठरत आहे. तसेच त्याच्यात कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याचे कौशल्य आहे आणि त्यासाठी तो तत्परही आहे.
यावर्षी भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या २८ वर्षीय दीपक हुड्डा (Deepak Hooda) याने भारताकडून आतापर्यंत ५ वनडे आणि ७ टी२० सामने खेळले आहेत. यावरून एक विशेष बाब लक्षात आली आहे. ती म्हणजे तो जेवढ्या सामन्यात खेळला तेवढेही सामने भारत जिंकला आहे. अशात त्याला संघात घेणे भारतासाठी लकी ठरत आहे.
हुड्डाने भारताकडून आतापर्यंत पाच वनडे सामने खेळले आहेत. त्यातील ४ डावांमध्ये त्याने ३८.३३च्या सरासरीने ११५ धावा केल्या आहेत. तर टी२०चे सात सामने खेळले आहेत. टी२०मध्ये त्याची कामगिरी उत्तम राहिली आहे. त्याने ५ डावात खेळताना ७१.६६च्या सरासरीने २१५ धावा केल्या आहेत. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये एक शतकही झळकावले आहे.
हुड्डाने लखनऊ येथे झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. हा सामना भारताने ६ विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर त्याने खेळलेल्या प्रत्येक सामन्यात भारत जिंकला आहे.
हुड्डाने फलंदाजी बरोबरच गोलंदाजीतही आपला हात आजमावला आहे. तो स्थानिक सामन्यांमध्ये नेहमी गोलंदाजी करताना दिसला आहे. त्याने वनडेमध्ये गोलंदाजी केली असून टी२०मध्ये अधिक संधी मिळाल्या नाहीत. त्याने वनडेमध्ये २ विकेट्सही घेतल्या आहेत. तर त्याच्या कारकिर्दीतील पहिली विकेट शामराह ब्रुक्सची होती.
हुड्डाने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) ९५ सामने खेळले आहेत. त्यातील ७५ डावांमध्ये खेळताना २०.२६च्या सरासरीने १२३६ धावा केल्या आहेत. तसेच आयपीएलमध्ये त्याने ७ अर्धशतकेही केली आहेत. त्याने ३० डावात गोलंदाजी करताना १० विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियात यंदा टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. यासाठी संघात निवड होण्यासाठी सगळे खेळाडू धडपड करत आहे. मात्र हुड्डाला सूर्यकुमार यादवच्या तुलनेत फार कमी वेळा संधी मिळाल्या आहेत. तसेच विराट संघात आला की त्याला एकतर बाकावर बसावे लागते अथवा खालच्या क्रमांकावर फलंंदाजी करावी लागते. यामुळे जर त्याला सतत संघात स्थान मिळाले तर त्याची टी२० विश्वचषकातही वर्णी लागू शकते आणि ते संघासाठी लाभदायकही ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रेणुकाच्या अफलातून गोलंदाजीने विरोधी संघाच्या दांड्या गुल! एकाच व्हिडिओमध्ये पाहा विकेट्सचा थरार
आता सुरू होणार मेडल्स जिंकण्यासाठीची अस्सल शर्यत, भारतासह ‘या’ ४ संघांचा सेमी फायनलमध्ये प्रवेश
तुलिका मानने ज्यूडोमध्ये भारताला मिळवून दिले सिल्वर मेडल, वाचा तिचा कॉमनवेल्थमधील प्रवास