युवा कबड्डीपटू दिपक नरवाल प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या मोसमात खेळण्यासाठी खुपच आतुर आहे.
नुकत्याच झालेल्या लिलावात प्रो कबड्डी लीगचे तीन वेळा विजेतेपद पटकावलेल्या पटना पायरेट्सने 57 लाख रूपयात करारबध्द केले आहे.
एका हिंदी वृत्तपत्राशी बोलताना दिपक म्हणाला की, “कबड्डी खेळाला प्रो-कबड्डी लीगमुळे चांगले दिवस आले आहेत. दिवसेंदिवस हा खेळ लोकप्रिय होत चालला आहे. येत्या काही काळात कबड्डी क्रिकेटपेक्षा लोकप्रिय होणार आहे. हा खेळ खुप जुना आहे आणि आशा आहे की हा खेळ लवकरच भारताच्याही बाहेर लीग स्वरुपात खेळला जाईल.”
गेल्या मोसमात बंगाल वारियर्सकडून खेळताना केलेल्या चांगली कामगिरी दिपकसाठी लिलावात फळाला आल्याची आपण सर्वांनीच पाहिले.
“येत्या मोसमातही चांगली कामगिरी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी दुसऱ्या हंगामापासुन खेळत आहे आणि माझ्यासाठी पाचवा हंगाम खुपच खास राहिला. ” असेही दिपक पुढे म्हणाला.
दिपक नरवालने त्याच्या प्रो कबड्डीच्या कारकीर्दीत 47 सामन्यात 194 रेड पॉईंट्स मिळवले आहेत.