ऑस्ट्रेलियम महिला क्रिकेट संघ तिसऱ्या वनडे सामन्यातही जबरदस्त प्रदर्शन करताना दिसला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उभय संघांतील हा तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना खेळला गेला. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करणारा ऑस्ट्रेलियन संघ 50 षटकांमध्ये 7 विकेट्सच्या नुकसानावर 338 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या धावांवर लगाम लावू शकले नाही, पण यादरम्यान दीप्ती शर्मा हिने मोठा विक्रम नावावर केला.
भारतासाठी या सामन्यात श्रेयांका पाटील या युवा केळाटूने 10 षटकात 57 धावा खर्च करून सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. अमनजोत कौर हिने 10 षटकात 2 विकेट्स घेतल्या. तर पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा (Deepti Sharma) यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. दीप्तीला एका विकेटवर समाधान मानावे लागले, पण या विकेटच्या जोरावर तीने वनडे क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या. दीप्ती भारतीय संघाकडून 100 विकेट्स घेणारी अवघी चौथ्या महिला खेळाडू ठरली आहे. झुलन गोस्वामी (255 विकेट्स), नुशीन अल खदीर (141 विकेट्स) आणि नीतू डेव्हिड (100) या महिला खेळाडूंनी भारतासाठी 100 पेक्षा जास्त वनडे विकेट्स घेतल्या होत्या.
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर ऑस्ट्रेलियासाठी सलामी फलंदाज फिबी लिचफइल्ड हिने 125 चेंडूत 119 धावांची सर्वोत्तम खेळी केली. तसेच सलामीला आलेली कर्णधार एलिसा हिली हिने 85 चेंडूत 82 धावा कुटल्या. 50 षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्सच्या नुकसानावर 338 धावांपर्यंत मजल मारली. (Deepti Sharma became the fourth woman player to take 100 ODI wickets for India)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत: यास्तिका भाटिया, स्मृती मानधना, रिचा घोष (यष्टीरक्षक), हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, मन्नत कश्यप, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग, श्रेकायन पाटील.
ऑस्ट्रेलिया: एलिसा हिली (यष्टीरक्षक आणि कर्णधार), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मुनी, ताहलिया मॅकग्रा, ऍशले गार्डनर, ऍनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शुट.
महत्वाच्या बातम्या –
रोहित शर्मानंतर कर्णधार कोण? इरफान पठाणने टीम इंडियाला दिला मोलाचा सल्ला
वादात सापडलेल्या उस्मान ख्वाजाची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला, ‘जेव्हा मी निरपराध मुलांना…’