देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला 11 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी आता राज्य संघटनांनी आपले संघ घोषित करण्यासाठी सुरुवात केलीये. विजेतेपदाचे दावेदार असलेल्या दिल्ली संघाची देखील संघनिवड जाहीर झाली असून, भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याचा संघात समावेश केला गेला आहे. डावखुरा फलंदाज नितिश राणा संघाचे नेतृत्व करेल.
इशांत शर्मा सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करण्याचे ध्येय त्याने ठेवलेय. यावर्षी देखील तो आयपीएलमध्ये सहभागी झाला नव्हता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करत तो भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. या वर्षाच्या सुरुवातीला रणजी ट्रॉफी दरम्यान तो अखेरच्या वेळी देशांतर्गत क्रिकेट खेळला होता. 2016 पासून तो भारतीय संघासाठी मर्यादित षटकांचे सामने खेळला नाही. 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध तो अखेरच्या वेळी कसोटी क्रिकेट खेळताना दिसलेला.
दिल्ली संघाचे नेतृत्व कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळणारा अनुभवी फलंदाज नितीश राणा करेल. या संघात अनेक आयपीएल गाजवलेल्या खेळाडूंचा देखील समावेश आहे. ऋतिक शोकीन (मुंबई इंडियन्स), नवदीप सैनी (राजस्थान रॉयल्स), अनुज रावत (आरसीबी), सिमरजीत सिंग (सीएसके), आयुष बदोनी आणि मयंक यादव (लखनऊ सुपरजायंट्स) आणि ललित यादव (दिल्ली कॅपिटल्स) यांचा समावेश असेल.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी दिल्ली संघ-
नितीश राणा (कर्णधार), हिम्मत सिंह (उपकर्णधार), हितेन दलाल, यश ढुल, अनुज रावत (यष्टीरक्षक), ऋतिक शौकीन, आयुष बदोनी, ललित यादव, ईशांत शर्मा, नवदीप सैनी, सिमरजीत सिंह, मयंक यादव, शिवांक वशिष्ठ, देव लकड़ा , प्रदीप सांगवान, प्रांशु विजयरान
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्या ताटात खाल्ले, त्याच ताटात छेद! रबाडाचे आयपीएलबद्दल मोठे भाष्य; म्हणाला, ‘भारतीयांच्या कमजोरीविषयी…’
क्रिकेटला काळीमा फासणारी बातमी! आयपीएलच्या प्रसिद्ध खेळाडूला विमानतळावरून अटक, बला’त्काराचा आरोप