दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली आणि तामिळनाडू यांच्यातील रणजी सामना अनिर्णित राहिला. यजमान संघाला अंतिम दिवशी पराभव टाळण्यात यश आले. तामिळनाडूला विजयासाठी फक्त 2 विकेट्सची गरज होती. सामना अनिर्णित राहिल्यानंतर दिल्लीचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी खूप चर्चेत आहे. बनावट दुखापतीमुळे त्याने सामन्याला उशीर केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सामन्याचा वेळ वाया गेला आणि सामना अनिर्णित राहिला.
सामन्याच्या शेवटच्या आणि चौथ्या दिवशी नवदीप सैनी दिल्लीकडून फलंदाजी करत होता. त्याने 64 चेंडूंचा सामना करत संघासाठी नाबाद 15 धावा केल्या. सामन्यादरम्यान तामिळनाडूच्या गोलंदाजाने सैनीला बाउन्सर चेंडू टाकला. जो त्याच्या हेल्मेटला लागला. चेंडू हेल्मेटवर आदळल्यानंतर, नवदीपने दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या त्याच्या फलंदाजीच्या साथीदाराला तो ठीक असल्याचे संकेत दिले. मात्र, काही सेकंदांनंतर तो ड्रेसिंग रूमकडे बोट दाखवत जमिनीवर पडला. रिप्ले पाहिल्यावर त्याने दुखापत झाल्याचे नाटक केल्याचे दिसून आले.
सलामीवीर सनत सांगवानच्या 83 धावांच्या संयमी खेळीमुळे दिल्लीने सोमवारी येथे रणजी करंडक गटातील डी सामन्यात तामिळनाडूला विजयाची नोंद करण्यापासून रोखले. दिल्लीने अखेरच्या दिवशी सकाळी पहिला डाव 8 बाद 264 धावांवर सुरू केला. त्यांनी अवघ्या दोन धावात उरलेले दोन फलंदाज गमावल्याने, दुसऱ्या बाजूला शतकवीर यश धुल (नाबाद 105) नाबाद राहिला. फॉलोऑन खेळत असताना दिल्लीने धुलची विकेट लवकर गमावली. मात्र, सांगवानने शानदार फलंदाजी दाखवत 231 चेंडूत 12 चौकारांसह अर्धशतक झळकावले.
Best actor of cricket goes to Navdeep saini in #DELvsTN #RanjiTrophy2024 #ranjitrophy pic.twitter.com/sRLb2WfMnx
— Anything Good (@Praveen11851683) October 21, 2024
त्याला कर्णधार हिम्मत सिंग (36 धावा) आणि जॉन्टी सिद्धू (23 धावा) यांची चांगली साथ लाभली. दिल्लीने शेवटच्या दिवशी 83 षटकांत आठ गडी गमावून 193 धावा करून सामना अनिर्णित ठेवला. तामिळनाडूकडून वॉशिंग्टन सुंदर (45 धावांत तीन विकेट), सोनू यादव (37 धावांत दोन विकेट) आणि अजित राम (52 धावांत दोन विकेट) यांनी विकेट घेतल्या. या सामन्यातून तामिळनाडूला तीन गुण मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या-
बाॅर्डर गावसकर मालिका खेळणार वाॅर्नर? म्हणाला, “मी मागे हटणार…”
IND vs NZ; पुण्यातील खेळपट्टी कशी असणार? फिरकीपटूंना मिळणार मदत?
टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संधी न मिळण्याबाबत काय म्हणाला संजू सॅमसन?